मुंबई : टीम इंडियातील (Team India) अनेक खेळाडूंचे असंख्य फॅन्स आहेत. हे फॅन्स त्यांना भेटण्यासाठी कधी-कधी मैदानात घुसखोरी करताना दिसतात. तर कधी हेच खेळाडू फॅन्सना शॉकिंग भेट देत त्यांचा दिवस अविस्मरणीय करत असतात.आता अशीच एक घटना समोर आली आहे, ज्यामध्ये एका माजी स्टार खेळाडूने फॅनची इच्छा पुर्ण केली आहे. या फॅनची इच्छा काय होती? व हा खेळाडू कोण होता, हे जाणून घेऊयात.  


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

भारताचा माजी क्रिकेटर अमित मिश्रा (Amit Mishra) सध्या आपल्या मजेशीर ट्विटमुळे खूप चर्चेत असतो. रोड सेफ्टी वर्ल्ड सीरीज 2022 (Road Safety World Series 2022) च्या पहिल्या सेमीफायनलमध्ये सुरेश रैनाचा (Suresh Raina) झेल पाहून तो देखील आश्चर्यचकित झाला होता आणि त्याने याबद्दल एक ट्विट केले. या ट्विटमध्ये त्याने सुरेश रैनाला टॅग करत,'मी तुमचे टाइम मशीन उधार घेऊ शकतो का? तुम्हाला जुन्या काळाप्रमाणे मैदानात उतरताना पाहून खूप आनंद होतो', अशा आशयाचे ट्विट केले होते. या ट्विटनंतर अनेकांनी सुरैश रैनाचे कौतूक केले होते.



फॅनची इच्छा काय? 
अमित मिश्राने (Amit Mishra) केलेल्या ट्विटमध्ये एका चाहत्याने गर्लफ्रेंडला फिरवण्यासाठी 300 रूपये देण्याची मागणी केली होती.फॅनची ही मागणी पाहून नेटकऱ्यांना धक्काच बसला. अनेकांना वाटलं असेल की कदाचित अमित मिश्रा त्याची इच्छा पुर्ण करणार नाही, मात्र त्याच्या विपरीतच घडले. 



अमित मिश्राच ट्विट 
फॅनने केलेली ही मागणी पाहुन अमित मिश्रा (Amit Mishra) ही नाराज झाला नाही. त्याने लगेचच त्याला UPI वरून 500 रुपये पाठवले आणि त्याचा स्क्रीनशॉट सोशल मीडियावर शेअर केला. या फोटोला त्याने 'पेमेंट झालं असं म्हणत तुमच्या डेटला शुभेच्छा' असा संदेश लिहला. या ट्विटनंतर अनेक जण अमित मिश्राचं कौतूक करत आहे. 


दरम्यान रोड सेफ्टी वर्ल्ड सीरिजच्या (Road Safety World Series 2022) पहिल्या सेमीफायनल मॅचमध्ये सुरेश रैनाने (Suresh Raina) ऑस्ट्रेलिया लीजेंड्सचा कर्णधार शेन वॉटसनचा शानदार कॅच घेतला. या त्याच्या कॅचचे सोशल मीडियावर कौतूक होत आहे. तर अनेक नेटकरी त्याने जुन्या आठवणी ताज्या केल्याचे म्हणत आहेत.