मुंबई : दक्षिण आफ्रिकेविरूद्ध पहिल्या टी20 सामन्याचा टॉस टीम इंडियाने जिंकला आहे. हा टॉस जिंकत टीम इंडियाने बॉलिगचा निर्णय घेतला आहे. तर दक्षिण आफ्रिका प्रथम बॅटींग करणार आहे. आता प्रथम बॅटींग करून दक्षिण आफ्रिका किती धावसंख्या उभारते हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.  


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

दक्षिण आफ्रिकेविरुद्ध तीन सामन्यांच्या टी20  मालिकेला आजपासून सुरूवात होत आहे.  पहिला सामना ग्रीनफिल्ड स्टेडिअमवर रंगणार आहे. या सामन्याला थोड्याच वेळात सुरूवात होणार आहे.  


पहिल्या T20 सामन्यात कर्णधार रोहित शर्माने चार महत्वपुर्ण बदल केले आहेत.अर्शदीप सिंग, दीपक चहर, ऋषभ पंत आणि आर अश्विन या खेळाडूंना संघात स्थान देण्यात आले आहे. 


कर्णधार टेंबा बावुमा दक्षिण आफ्रिकेच्या संघात पुनरागमन केले आहे. टेंबा बावुमा जखमी झाला होता. विश्वचषकाच्या दृष्टीने बावुमासाठी ही मालिका खूप महत्त्वाची आहे. 


मालिका जिंकण्याची संधी
भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात मायदेशात तीन टी-20 मालिका खेळल्या गेल्या आहेत. ज्यामध्ये दक्षिण आफ्रिकेने एक जिंकला आहे आणि 2 मालिका अनिर्णित राहिली आहे. 2015 मध्ये पहिली T20 मालिका खेळली गेली, जी दक्षिण आफ्रिकेने जिंकली, त्यानंतर 2019 आणि 2022 मध्ये बरोबरी सुटल्या होत्या. 


भारतीय संघ : रोहित शर्मा (कर्णधार), केएल राहुल (उपकर्णधार), विराट कोहली, सूर्यकुमार यादव, ऋषभ पंत (विकेटकीपर), दिनेश कार्तिक, अक्षर पटेल, दीपक चहर, हर्षल पटेल, आर अश्विन, अर्शदीप सिंग


दक्षिण आफ्रिका संघ : क्विंटन डी कॉक (विकेटकीपर), टेम्बा बावुमा (क), रिले रोसो, एडन मार्कराम, डेव्हिड मिलर, ट्रिस्टन स्टब्स, वेन पारनेल, तबरेझ शम्सी, एनरिक नॉर्टजे, कागिसो रबाडा, महाराजा.