केपटाऊन : टीम इंडिया विरुद्ध दक्षिण आफ्रिका (IND vs Sa 3Rd Test) यांच्यात 11 जानेवारीपासून मालिकेतील तिसरा आणि शेवटचा कसोटी सामना खेळवण्यात येणार आहे. तीन सामन्यांची मालिका 1-1 ने बरोबरीत आहे. त्यामुळे तिसरा सामना मालिका विजयाच्या दृष्टीने निर्णायक होणार आहे. या तिसऱ्या आणि महत्तवपूर्ण सामन्याआधी आफ्रिकेचा कर्णधार डीन एल्गरने (South Africa Captain Dean Elgar) प्लॅन तयार केला आहे. या सामन्यासाठी आफ्रिकेने रणनिती आखली आहे. (ind vs sa test series south africa captain dean elgar game plan for 3rd test match against team india at capetown)


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

एल्गर काय म्हणाला?


"आता आम्हाला आव्हानात्मक सामन्यांचा सामना करायचा आहे. यामध्ये मंगळवारपासून सुरु होणाऱ्या कसोटीचाही समावेश आहे. आम्हाला वेगवेगळ्या आव्हानांचा सामना कराव लागेल. या आव्हानांबाबत खेळाडूंची प्रतिक्रिया काय असेल, हे पाहणं देखील तितकंच महत्त्वाचं असेल. आमची योग्य दिशेने वाटचाल सुरु आहे. यामुळे संघातील खेळाडूंचा आत्मविश्वास आणखी दुणावेल", असं डीन एल्गर म्हणाला.


एल्गरची विजयी खेळी


एल्गरने दुसऱ्या कसोटीत विजयी खेळी केली होती. एल्गरने दुसऱ्या सामन्यात 96 धावांची नाबाद खेळी केली. तसेच रेसी वान डेर डुसेन आणि टेंबा बावुमासह निर्णायक भागीदारी केली.   


"या विजयामुळे संघातील नव्या खेळाडूंच्या विश्वासात वाढ झाली आहे. तसेच उत्साह वाढला आहे. ही अगदी सकारात्मक दिशेने उचललेलं पाऊल आहे. यात तिळमात्र शंका नाही", असं एल्गरने नमूद केलं.


केपटाऊनमध्ये मालिकेचा निकाल


दरम्यान 3 सामन्यांची मालिका बरोबरीत असल्याने तिसरा सामना हा रंगतदार आणि चुरशीचा होणार आहे. तिसऱ्या सामन्याला 11 जानेवारीपासून सुरुवात होणार आहे. या सामन्याच्या निकालासह मालिकेचाही निकाल लागेल. त्यामुळे ही मालिका कोण जिंकणार, याकडे क्रिकेट चाहत्यांचं लक्ष असणार आहे.