Virat Kohli : बर्थडेला विश्वविक्रम करणाऱ्या विराटसाठी अनुष्का शर्माची खास इन्स्टाग्राम पोस्ट, म्हणते...
Anushka Sharma post on Virat Kohli`s Century : टीम इंडियाच्या किंग कोहलीने 49 वं शतक ठोकत विश्वविक्रम रचला. अशातच अनुष्का शर्माने पोस्ट करत आपल्या नवऱ्याचं कौतूक केलंय.
Virat Kohli's 49th ODI ton : भारतीय क्रिकेट संघाची रनमशिन विराट कोहली (Virat Kohli) याने ईडन गार्डन मैदानावर (Eden Gardens, Kolkata) साऊथ अफ्रिकेविरुद्ध शतक ठोकलं. या शतकासह विराट कोहलीने वनडेमध्ये सर्वाधिक शतक करणाऱ्या सचिन तेंडुलकरची बरोबरी केली आहे. विराट कोहलीने अवघ्या 277 डावात 49 वं वनडे शतक ठोकलंय. तर सचिनला अशी कामगिरी करण्यासाठी 452 डाव खेळावे लागले होते. विराटने आपल्या वाढदिवसादिवशी शतक (Virat Kohli's Century) ठोकत स्वत:ला वाढदिवसाचं गिफ्ट दिलंय. अशातच आता विराट कोहलीची पत्नी आणि बॉलिवूड अभिनेत्री अनुष्का शर्माने इन्स्टाग्राम पोस्ट (Anushka Sharma instagram post) करत विराटला खास शुभेच्छा दिल्या आहेत.
संथ दिसणाऱ्या खेळपट्टीवर विराटने नजरा जमवल्या अन् रनमशिन सुरू केली. विराट कोहली त्याच्या वाढदिवशी विश्वचषकात शतक ठोकणारा पहिला भारतीय ठरला आहे. 119 बॉलमध्ये विराटने आपलं शतक पूर्ण केलंय. विराटच्या शकतासाठी आज अनेक क्रिकेटप्रेमी वाट पाहत होते. अखेर विराटने शतक ठोकून सर्वांना रिटर्न गिफ्ट दिलंय. अनुष्का शर्माने विराटच्या शतकानंतर खास पोस्ट केली. अपने बर्थडे पे खुद को प्रेझेंट, असं अनुष्का या पोस्टमध्ये म्हणते.
विराटच्या बर्थडेनिमित्त अनुष्काची पोस्ट
विराटच्या बर्थडेनिमित्त अनुष्काने खास पोस्ट लिहिली होती. आयुष्यात असलेल्या सगळ्या भूमिका तो चांगल्या पद्धतीनं साकारतो! आणि प्रत्येक वेळी तो असं काही करून जातो की वेगवेगळ्या गोष्टींमध्ये कामगिरी करत आहे. या आयुष्यात आणि याच्या पुढे येणाऱ्या सगळ्याच आयुष्यात मी तुझ्यावर प्रत्येक क्षणी, कोणत्याही परिस्थितीत प्रेम करत राहणार, मग काहीही असो, असं अनुष्काने म्हटलं होतं.