मुंबई  : टीम इंडियाने श्रीलंका विरुद्धच्या दुसऱ्या कसोटीतील   (India vs Sl 2nd Test Match) पहिल्या डावात 252 धावा केल्या आहेत. श्रेयस अय्यरच्या (Shreyas Iyer) झुंजार खेळीच्या जोरावर टीम इंडियाला 250 पेक्षा अधिका धावांचा पल्ला गाठता आला. श्रेयस नव्हर्स नाईन्टीचा शिकार झाला. (ind vs sl 2nd test day 1 team india all out in 252 runs in 1st innings shreyas iyer missed century for 8 runs at m chinnaswamy stadium bengaluru)


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

अवघ्या 8 धावांसाठी श्रेयसचं शतक हुकलं. श्रेयसने सर्वाधिक 92 धावांची खेळी केली. या व्यतिरिक्त टीम इंडियाच्या फलंदाजांना मोठा आकडा गाठता आला नाही. श्रीलंकेकडून लसिथ एम्बुल्डेनिया आणि प्रवीण जयविक्रमा या दोघांनी प्रत्येकी 2 विकेट्स घेतल्या.


निराशाजनक सुरुवात


बॅटिंगसाठी आलेल्या टीम इंडियाची निराशाजनक सुरुवात राहिली. टीम इंडियाने पहिले 2 विकेट्स 29 धावांच्या मोबदल्यात झटपट गमावले. आधी गडबडीत मयंक अग्रवाल 4 धावा करुन रनआऊट झाला. त्यानंतर रोहित शर्मा 15 धावा करुन माघारी परतला. 


खराब सुरुवात झाल्याचा दबाव हा मिडल ऑर्डरवर पाहायला मिळाला. मधल्या फळीतील फलंदाजांनी झुंजार खेळी करत डाव सावरण्याचा प्रयत्न केला. 


त्यानुसार हनुमा विहारी, विराट कोहली आणि रिषभ पंत या तिकडीला सुरुवात चांगली मिळाली. मात्र या तिघांपैकी एकालाही या आकड्याचं मोठ्या खेळीच रुपांतर करता आलं नाही. विराटने 23, हनुमाने 31 तर रिषभने 39 धावांचं योगदान दिलं. 


अय्यरचं शतक हुकलं


अय्यरने टीम इंडियाला सावरण्याचा प्रयत्न केला. मात्र त्याला इतर खेळाडूंकडून अपेक्षित मदत मिळाली नाही. एकाबाजूला ठराविक अंतराने विकेट जात होते, तर दुसऱ्या बाजूला श्रेयस खिंड लढवत होता. 


टीम इंडिया प्लेइंग इलेव्हन : रोहित शर्मा (कॅप्टन) मयंक अग्रवाल, हनुमा विहारी, विराट कोहली, श्रेयस अय्यर, ऋषभ पंत (विकेटकीपर), रवींद्र जडेजा, रवीचंद्रन अश्विन, अक्षर पटेल, मोहम्मद शमी आणि जसप्रीत बुमराह. 


श्रीलंका प्लेइंग XI | दिमुथ करुणारत्ने (कर्णधार), लाहिरू थिरिमाने, कुसल मेंडिस, अँजेलो मॅथ्यूज, धनंजया डी सिल्वा, चरिथ असलंका, निरोशन डिकवेला (विकेटकीपर), सुरंगा लकमल, लसिथ एम्बुल्डेनिया, विश्व फर्नांडो आणि प्रवीण जयविक्रमा.