IND vs SL 2nd Test | टीम इंडियाच्या भेदक माऱ्यासमोर लंकेची शरणागती, पहिल्या डावात 109 धावा
टीम इंडिया विरुद्ध श्रीलंका (IND vs SL 2nd Test) यांच्यातील दुसऱ्या कसोटीतील दुसऱ्या दिवसाचा खेळ सुरु आहे.
मुंबई : टीम इंडिया विरुद्ध श्रीलंका (IND vs SL 2nd Test) यांच्यातील दुसऱ्या कसोटीतील दुसऱ्या दिवसाचा खेळ सुरु आहे. या दुसऱ्या दिवशी श्रीलंका ऑलआऊट झाली आहे. टीम इंडियाच्या भेदक माऱ्यासमोर श्रीलंकेच्या फलंदाजांनी शरणागती पत्कारली. टीम इंडियाच्या पहिल्या डावातील 252 धावांना प्रत्त्युतर देताना लंकेला पहिल्या डावात 35.5 ओव्हरमध्ये ऑलआऊट 109 धावाच करता आल्या. यामुळे टीम इंडियाला दुसऱ्या डावात 143 धावांची मजबूत आघाडी मिळाली आहे. (ind vs sl 2nd test day 2 sri lanka all out on 109 runs in 1st innings team india get lead 143 runs at m chinnaswamy stadium bengaluru)
श्रीलंकेकडून एंजलो मॅथ्यूजने सर्वाधिक 42 धावांची खेळी केली. निरोशन डिकवेलाने 21 धावांच योगदान दिलं. धनंजया डीसिल्व्हाने 10 धावा केल्या. या व्यतिरिक्त लंकेच्या एकाही फलंदाजाला दुहेरी आकडा गाठता आला नाही.
बुमराहचा जोरदार पंच
टीम इंडियाकडून 'यॉर्करकिंग' जसप्रीत बुमराहने सर्वाधिक 5 विकेट्स घेत लंकेचं कंबरड मोडलं. तर रवीचंद्रन अश्विन आणि मोहम्मद शमीने प्रत्येकी 2 फलंदाजांना मैदानाबाहेरचा रस्ता दाखवला. तसेच अक्षर पटेलने 1 विकेट घेत चांगली साथ दिली.
दरम्यान याआधी टीम इंडियाने पहिल्या डावात सर्वबाद 252 धावा केल्या. यामध्ये टीम इंडियाकडून श्रेयस अय्यरने 92 धावांची खेळी केली. तर रिषभ पंतने 39 आणि हनुमा विहारीने 31 धावा केल्या.
टीम इंडिया प्लेइंग इलेव्हन : रोहित शर्मा (कॅप्टन) मयंक अग्रवाल, हनुमा विहारी, विराट कोहली, श्रेयस अय्यर, ऋषभ पंत (विकेटकीपर), रवींद्र जडेजा, रवीचंद्रन अश्विन, अक्षर पटेल, मोहम्मद शमी आणि जसप्रीत बुमराह.
श्रीलंका प्लेइंग XI | दिमुथ करुणारत्ने (कर्णधार), लाहिरू थिरिमाने, कुसल मेंडिस, अँजेलो मॅथ्यूज, धनंजया डी सिल्वा, चरिथ असलंका, निरोशन डिकवेला (विकेटकीपर), सुरंगा लकमल, लसिथ एम्बुल्डेनिया, विश्व फर्नांडो आणि प्रवीण जयविक्रमा.