मुंबई : टीम इंडिया विरुद्ध श्रीलंका यांच्यात उद्यापासून (12 मार्च) कसोटी मालिकेतील दुसरा (IND vs SL 2nd Test) आणि शेवटचा सामना हा बंगुळुरुत (M Chinnaswamy Stadium Bengaluru) खेळवण्यात येणार आहे. या 2 मॅचच्या सीरिजमध्ये टीम इंडिया 1-0 ने आघाडीवर आहे. त्यामुळे रोहितसेना ही दुसरी टेस्ट जिंकून लंकादहन करण्याच्या प्रयत्नात असेल. तर दुसऱ्या बाजूला विराट कोहलीला (Virat Kohli) या सामन्यात मोठा विक्रम मोडित काढण्याची संधी आहे. (ind vs sl 2nd test match team india virat kohli has needed to 23 runs for break australia allrounder mark waugh test runs)


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

विराटला ऑस्ट्रेलियाचा माजी ऑलराऊंडर मार्क वॉ याचा कसोटी धावांचा रेकॉर्ड ब्रेक करण्याची संधी आहे. यासाठी विराटला 23 धावांची आवश्यकता आहे. विराटने आतापर्यंत एकूण 100 सामन्यांमध्ये 8 हजार 7 धावा केल्या आहेत. 


तर मार्क वॉने 128 कसोटी सामन्यांमध्ये 8 हजार 29 धावा केल्या आहेत. यामुळे विराट श्रीलंका विरुद्धच्या दुसऱ्या सामन्यात 23 धावा करुन वॉला मागे टाकू शकतो. त्यामुळे विराट कशी कामगिरी करतो, याकडे सर्वांचंच लक्ष असणार आहे.  


कसोटी मालिकेसाठी टीम इंडिया : रोहित शर्मा (कॅप्टन), प्रियांक पांचाळ, मयंक अग्रवाल, विराट कोहली, श्रेयस अय्यर, हनुमा विहारी, शुभमन गिल, ऋषभ पंत (विकेटकीपर), केएस भरत, रवींद्र जडेजा, जयंत यादव, आर अश्विन, सौरभ कुमार, मोहम्मद सिराज, उमेश यादव, मोहम्मद शमी, जसप्रीत बुमराह आणिअक्षर पटेल.