Ind vs Sl 3rd ODI : विराटच्या वादळासमोर श्रीलंकेचा धुरळा, `इतक्या` धावांचं आव्हान!
भारत आणि श्रीलंकेमधील तिसऱ्या एकदिवसीय गिल आणि कोहलीने केलेल्या शतकी खेळीच्या जोरावर भारताने 350 धावांचा पल्ला पार केला. श्रीलंकेला विजयसाठी 391 धावांचं आव्हान असणार आहे.
IND vs SL 3rd ODI : भारत आणि श्रीलंकेमधील तिसऱ्या एकदिवसीय (IND vs SL) सामन्यात रोहित शर्माने टॉस जिंकत प्रथम बॅटींगचा निर्णय घेतला होता. निर्धारित 50 षटकात 391 धावांचं आव्हान दिलं आहे. विराट कोहली नाबाद 166 (Virat Kohli Century) आणि शुभमन गिल 116 यांच्या शतकी खेळीच्या जोरावर भारताने 350 धावांचा टप्पा पार केला. पहिले दोन्ही सामने जिंकत भारताने मालिका खिशात घातली आहे. श्रीलंकेच्या संघाला हा सामना जिंकत व्हाईटवॉश टाळण्याचं आव्हान असणार आहे. (Ind vs Sl 3rd ODI first india inning srilanka latets marathi sport news)
भारत आणि श्रीलंकेमधील तिसऱ्या एकदिवसीय (IND vs SL) सामन्यात रोहित शर्माने टॉस जिंकत प्रथम बॅटींगचा निर्णय घेतला होता. निर्धारित 50 षटकात 391 धावांचं आव्हान दिलं आहे. विराट कोहली नाबाद 166 (Virat Kohli Century) आणि शुभमन गिल 116 यांच्या शतकी खेळीच्या जोरावर भारताने 350 धावांचा टप्पा पार केला. पहिले दोन्ही सामने जिंकत भारताने मालिका खिशात घातली आहे. श्रीलंकेच्या संघाला हा सामना जिंकत व्हाईटवॉश टाळण्याचं आव्हान असणार आहे.
दरम्यान, श्रीलंकेच्या सर्वच गोलंदाजांना भारतीय बॅटर्सनी चांगलंच झोडलं. लाहिरू कुमाराने 10 षटकात 87 आणि कसुन राजिथाने 81 धावा देत प्रत्येकी 2 गडी बाद केले. चमिका करूणारत्नेने एक गडी बाद केला. इतर गोलंदाजांना विकेट घेण्यात यश आलं नाही.
दरम्यान, टीम इंडियाचं रन मशिन म्हणून ओळख असलेल्या विराट कोहलीने कारकिर्दीतील 46 वं शतक ठोकलं आहे. विराट कोहलीने भारताचा मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरचा विक्रम मोडला आहे.