Team India Predicted Playing XI For 3rd ODI: टीम इंडियाने (Team India) गुरुवारी कोलकाता येथील ईडन गार्डन्स स्टेडियमवर खेळल्या गेलेल्या दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात श्रीलंकेचा (India vs Sri Lanka) पराभव केला. या विजयासह टीम इंडियाने 3 सामन्यांच्या वनडे मालिकेत 2-0 ने आघाडी घेतली आहे. त्यानंतर आता तिसऱ्या सामन्यात (IND vs SL, 3rd ODI) लंका दहन करून क्लिन स्वीप देण्याचा प्रयत्न रोहितसेना करणार आहे. अशातच आता तिसऱ्या सामन्यात कॅप्टन रोहित मोठे निर्णय घेऊन वर्ल्ड कपची (World Cup 2023) तयारी करतोय का?, असा सवाल उपस्थित केला जातोय. (IND vs SL 3rd ODI Who will get the chance Who will be out Rohit is preparing for the World Cup 2023 marathi news)


कोणाला मिळणार संधी?


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

श्रीलंकेविरुद्धच्या तिसऱ्या सामन्यासाठी टीम इंडियाच्या प्लेइंग इलेव्हनमध्ये बदल केला जाण्याची शक्यता आहे. सूर्यकुमार यादवचा (Suryakumar Yadav) प्लेइंग इलेव्हनमध्ये समावेश केला जाऊ शकतो. सूर्याने श्रीलंकेविरुद्धच्या टी-20 मालिकेत एक शतक आणि एक अर्धशतक झळकावलं होतं. त्याच्याशिवाय ईशान किशनला (Ishaan Kishan) देखील तिसऱ्या वनडेत संधी मिळू शकते, अशी शक्यता वर्तविण्यात येत आहे. या दोघांशिवाय अर्शदीप (Arshdeep Singh) आणि अष्टपैलू वॉशिंग्टन सुंदर (Washington Sundar) यांचाही तिसऱ्या वनडे समावेश केला जाऊ शकतो.


तिसऱ्या वनडेसाठी भारताची संभाव्य प्लेइंग इलेव्हन: 


रोहित शर्मा, ईशान किशन, विराट कोहली, श्रेयस अय्यर, सूर्यकुमार यादव, हार्दिक पांड्या, वॉशिंग्टन सुंदर, युझवेंद्र चहल, मोहम्मद सिराज, अर्शदीप सिंग आणि उमरान मलिक.


आणखी वाचा - ICC U-19 Women's World Cup: हमारी छोरियां छोरो से कम है के! वर्ल्ड कपमध्ये विजयी सलामी


द्रविड इस बॅक 


टीम इंडिया आणि श्रीलंका (India vs Sri lanka) यांच्यातील तीन वनडे सामन्यांच्या मालिकेतील शेवटचा सामना 15 जानेवारी रोजी तिरुअनंतपुरम येथे खेळवला जाणार आहे. या सामन्यापूवी टीम इंडियासाठी धक्कादायक बातमी समोर आली होती. प्रशिक्षक राहूल द्रविड (Rahul Dravid) यांची तब्येत अचानक बिघडली होती. शुक्रवारी सकाळी भारतीय संघ आणि उर्वरित सपोर्ट स्टाफ तिरुअनंतपुरमला तिसऱ्या सामन्यासाठी रवाना झाले होते. तर प्रशिक्षक राहुल द्रविड कोलकाताहून थेट बेंगळुरूला पोहोचले. त्यानंतर द्रविड पुन्हा टीमसोबत जोडले गेल्याचं दिसतंय.