मुंबई : भारत विरुद्ध श्रीलंका तिसरा कसोटी सामना आज होणार आहे. टीम इंडियाने 2-0 ने आघाडी घेतली आहे. आता श्रीलंकेला तिसरा सामन्यातही धूळ चारून क्लीन स्वीप देणार का हे पाहाणं महत्त्वाचं ठरणार आहे.  दुसऱ्या टी 20 सामन्यामध्ये श्रेयस अय्यरने  44 बॉलमध्ये 74 धावा केल्या आहेत. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

टी 20 वर्ल्ड कपला डोळ्यासमोर ठेवून रोहित शर्मा टीम निवडण्यावर भर देत आहे. आजच्या प्लेइंग इलेव्हनमध्ये कोणते बदल होणार हे देखील पाहाणं महत्त्वाचं ठरणार आहे. संजू सॅमसनने 39 धावांची खेळी केली आहे. रविंद्र जडेजा चांगल्या फॉर्ममध्ये आहे. 


श्रेयस अय्यर आणि संजू सॅमसन सध्या फुल फॉर्ममध्ये आहेत. त्यामुळे तिसऱ्या टी 20 सामन्यासाठी संजू सॅमसन ओपनिंगला उतरण्याची शक्यता आहे. ईशान किशनची प्रकृती संध्या ठिक आहे. त्याला रुग्णालयातून डिस्चार्ज मिळाला आहे. मात्र तो या सामन्यात दिसणार की नाही याबाबत अद्यापही प्रश्नचिन्हं आहे. 


ईशान किशन ओपनिंगसाठी मैदानात उतरतो. मात्र तो दुखापतीमुळे खेळू शकला नाही तर संजू सॅमसनवर ही जबाबदारी दिली जाण्याची शक्यता आहे. मयंक अग्रवालला देखील प्लेइंग इलेव्हनमध्ये संधी दिली जाण्याची शक्यता आहे. तर आवेश खान आणि रवी बिश्नोईला देखील संधी दिली जाऊ शकते. 


टीम इंडिया संभाव्य प्लेइंग इलेव्हन : संजू सॅमसन, मयंक अग्रवाल, श्रेयस अय्यर, रोहित शर्मा (कर्णधार), रविंद्र जडेजा, वेंकटेश अय्यर, दीपक हुड्डा, हर्षल पटेल, आवेश खान, जसप्रीत बुमराह, रवि बिश्नोई.