कोलंबो : तिसऱ्या टी 20 सामन्यात श्रीलंकेने (Ind vs sl 3rd t2oi) टीम इंडियावर 7 विकेट्सने विजय मिळवला आहे. या विजयासह श्रीलंकेने मालिकाही जिंकली आहे. टीम इंडियाने श्रीलंकाला विजयासाठी 82 धावांचे माफक आव्हान दिले होते. हे विजयी आव्हान श्रीलंकेने  3 विकेट्सच्या मोबदल्यात पूर्ण केलं. श्रीलंकेकडून धनंजया डी सिल्वाने (Dhananjaya de Silva) सर्वाधिक नाबाद 23 धावांची खेळी केली. (Ind vs sl 3rd t2oi Sri Lanka beat Team India by 7 wickets in the third t2oi match to win the series 2-1 at colmbo)