IND vs SL: भारतीय क्रिकेट चाहत्यांसाठी मोठी बातमी, दुखापतीतून सावरल्यानंतर `या` क्रिकेटपटू टीम इंडियात दिसणार
Indian Cricket Team: भारत विरुद्ध श्रीलंका (IND vs SL) मालिका 3 जानेवारी 2023 पासून सुरू होणार आहे. या मालिकेत एकूण 3 टी-20 आंतरराष्ट्रीय आणि 3 एकदिवसीय सामने खेळवले जातील. यासामन्या दरम्यान आनंदाची बातमी समोर येत आहे.
India VS Sri Lanka: भारत विरुद्ध श्रीलंका (IND vs SL) मालिका 3 जानेवारी 2023 पासून सुरू होणार आहे. या मालिकेत एकूण 3 टी-20 आंतरराष्ट्रीय आणि 3 एकदिवसीय सामने खेळवले जाणार आहे. श्रीलंकेविरुद्ध खेळल्या जाणाऱ्या टी-20 आणि एकदिवसीय मालिकेसाठी टीम इंडियाची घोषणा करण्यात आली आहे. दोन्ही संघांदरम्यान खेळल्या जाणार्या टी-20 मालिकेत हार्दिक पांड्या (hardik Pandya) संघाचे नेतृत्व करेल. तर एकदिवसीय मालिकेत रोहित शर्मा (Rohit Sharma) कर्णधार असेल. या मालिकेचदरम्यान क्रिकेट विश्वातून आनंदाची बातमी समोर येते, ती म्हणजे या मालिकेत संघाचा एक घातक वेगवान गोलंदाज टीम इंडियात पुन्हा परतणार आहे. हा खेळाडू दुखापत झाल्यामुळे संघाबाहेर पडला होता. मात्र आता हा गोलंदाज वनडे मालिकेत खेळताना दिसणार आहे.
हा गोलंदाज दुखापतीतून सावरल्यानंतर परतला
दोन्ही संघांमध्ये खेळल्या जाणाऱ्या वनडे मालिकेत सीनियर वेगवान गोलंदाज मोहम्मद शमी मैदानात परतणार आहे. त्याचा वनडे संघात समावेश करण्यात आला आहे. भारतीय संघाचा स्टार गोलंदाज मोहम्मद शमी (Mohammed Shami) दुखापतीमुळे वनडे मालिकेतून बाहेर पडला आहे. सराव दरम्यान त्याच्या हाताला आणि खांद्याला दुखापत झाली. त्यामुळे तो संघाच्या बाहेर होता.
T20 वर्ल्ड कपमध्ये खेळताना दिसला होता
T20 विश्वचषक 2022 नंतर मोहम्मद शमी आता प्रथमच टीम इंडियामध्ये खेळताना दिसणार आहे. त्याने टीम इंडियासाठी आतापर्यंत 60 कसोटी, 82 वनडे आणि 23 टी-20 सामने खेळले आहेत. त्याच्या नावावर कसोटीत 216, एकदिवसीय सामन्यात 152 आणि T20 मध्ये 24 विकेट आहेत. त्याचवेळी मोहम्मद शमीने जुलै 2022 पासून टीम इंडियासाठी एकही वनडे खेळलेला नाही.
वाचा : सुशांत सिंह राजपूत आत्महत्येप्रकरणी नव्या दाव्यानंतर रिया चक्रवर्तीची पोस्ट
टी-20 मालिकेसाठी टीम इंडिया
हार्दिक पांड्या, सूर्यकुमार यादव, ईशान किशन, ऋतुराज गायकवाड, शुभमन गिल, दीपक हुडा, राहुल त्रिपाठी, संजू सॅमसन, अर्शदीप सिंग, वॉशिंग्टन सुंदर, अक्षर पटेल, युझवेंद्र चहल, हर्षल पटेल, उमरान मलिक, मुकेश कुमार, शिवम मावी.
वनडे मालिकेसाठी टीम इंडिया
रोहित शर्मा, हार्दिक पांड्या, विराट कोहली, शुभमन गिल, सूर्यकुमार यादव, केएल राहुल, श्रेयस अय्यर, इशान किशन, वॉशिंग्टन सुंदर, युझवेंद्र चहल, कुलदीप यादव, अक्षर पटेल, मोहम्मद सिराज, मोहम्मद शमी, उमरान मलिक, अर्शदीप सिंग.