IND vs SL: पहिल्या वनडेपूर्वी सरकारचं क्रिकेटप्रेमींना गिफ्ट; सामन्याच्या दिवशी कर्मचाऱ्यांना सुट्टी!
पहिला सामना गुवाहाटीच्या बरसापारा क्रिकेट स्टेडियम (Barsapara Cricket Stadium, Guwahati) मध्ये खेळवला जाणार आहे. या सामन्यापूर्वी सरकारने नागरिकांना एक मोठं गिफ्ट दिलं आहे.
IND vs SL: भारत आणि श्रीलंका (IND vs SL) यांच्यामध्ये 10 जानेवारीपासून 3 सामन्यांची वनडे सिरीज (ODI series) खेळवण्यात येणार आहे. पहिला सामना गुवाहाटीच्या बरसापारा क्रिकेट स्टेडियम (Barsapara Cricket Stadium, Guwahati) मध्ये खेळवला जाणार आहे. दरम्यान या सामन्यासाठी आसाम सरकार (Government of Assam) खूप एक्टिव्ह असल्याचं दिसून येतंय. या सामन्यापूर्वी आसाम सरकारने नागरिकांना एक मोठं गिफ्ट दिलं आहे.
आसाम सरकारकडून क्रिकेटप्रेमींना मोठं गिफ्ट
भारत आणि श्रीलंका (IND vs SL) यांच्यामध्ये गुवाहाटीच्या बारसापारा स्टेडियममध्ये खेळला जाणारा सामन्यासंदर्भात सरकारने मोठा निर्णय घेतला आहे. मुख्य म्हणजे 4 वर्षांनंतर गुवाहाटीच्या स्डेडियममध्ये सामना खेळवला जाणार आहे. हीच बाब लक्षात घेता, आसाम सरकारने चाहत्यांचा विचार करत सामन्याच्या दिवशी म्हणजेच 10 जानेवारी रोजी 'हाफ डे'च्या सुट्टीची घोषणा केली आहे. सरकारने ही सुट्टी केवळ जिल्ह्यासाठी जाहीर करण्यात आलीये.
सामन्यापूर्वी मुख्यमंत्र्यांनी घेतला तयारीचा आढावा
क्रिकेटची फेस भारतातील लोकांमध्ये अधिक प्रमाणात दिसून येते. श्रीलंका विरूद्ध भारत हा सामना भारतात खेळला जातोय. गुवाहाटीतील बरसापारा क्रिकेट स्टेडियमवर खेळलेले चाहते बरेच खूप उत्सुक दिसतायत. या सामन्यात चाहत्यांना विराट-रोहित तसंच सूर्यकुमार यांना थेट खेळताना पाहण्याची संधी मिळणार आहे.
यावेळी आसामचे मुख्यमंत्री हिमंता बिस्वा सरमा या सामन्याबाबत यांनी स्वतः बरसापारा स्टेडियमची पाहणी करून तयारीचा आढावा घेतलाय. संपूर्ण व्यवस्थेबाबत त्यांनी आसाम क्रिकेट असोसिएशनच्या अधिकाऱ्यांशीही चर्चा केलीये. याशिवा. गुवाहाटी पोलिसांनी ठोस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. इतकंच नाही तर 7 जानेवारी रोजी ट्रॅफिक नियमांबाबत एक मार्गदर्शक सूचनाही जारी करण्यात आलीये.
पहिल्या सामन्यापूर्वी टीम इंडियाला मोठा धक्का
मिळालेल्या माहितीनुसार बुमराह इतर खेळाडूंबरोबर गुवाहाटीला पोहोचलेला नाही. गुवाहाटीत 10 जानेवारीला पहिला एकदिवसीय सामना खेळवला जाणार आहे. लंकेविरुद्ध बीसीसीआयने एकदिवसीय संघ जाहीर केला तेव्हा बुमराहचा समावेश करण्यात आला नव्हता. पण 3 जानेवारीला बुमराहचा अचानक संघात समावेश करण्यात आला. त्यामुळे जसप्रीत बुमराह आता पूर्णपणे फिट असून खेळण्यास सज्ज असल्याचं चाहत्यांना वाटलं.
यंदाचं वर्ष हे एकदिवसीय क्रिकेट वर्ल्ड कपचं वर्ष आहे. त्यामुळे बीसीसीआय कोणताही धोका पत्करुन इच्छित नाही. त्यामुळेच बुमराहला श्रीलंकेविरुद्धच्या मालिकेपासून दूर ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्याला दुखापतीतून पूर्णपणे बरं होण्याचा वेळ दिला जाणार आहे.