IND vs SL : सुर्यकुमार यादवला खुणावतोय `हा` मोठा रेकॉर्ड, जाणून घ्या
श्रीलंकेविरूद्ध टी20 मालिका विजयानंतर आता टीम इंडिया (Team India) वनडे मालिकेसाठी सज्ज झाली आहे. या वनडे मालिकेला उद्या 10 जानेवारीपासून सूरूवात होत आहे. या मालिकेत टी20 प्रमाणेच वनडेत देखील सूर्याचे वादळ पाहायला मिळणार आहे.त्याचबरोबर सूर्याला (Surykumar yadav)वनडे क्रिकेटमध्ये अनेक विक्रम करण्याची संधी आहे.हे विक्रम नेमके कोणते असणार आहेत, हे जाणून घेऊयात.
IND vs SL Suryakumar Yadav : श्रीलंकेविरूद्ध टी20 मालिका विजयानंतर आता टीम इंडिया (Team India) वनडे मालिकेसाठी सज्ज झाली आहे. या वनडे मालिकेला उद्या 10 जानेवारीपासून सूरूवात होत आहे. या मालिकेत टी20 प्रमाणेच वनडेत देखील सूर्याचे वादळ पाहायला मिळणार आहे.त्याचबरोबर सूर्याला (Surykumar yadav)वनडे क्रिकेटमध्ये अनेक विक्रम करण्याची संधी आहे.हे विक्रम नेमके कोणते असणार आहेत, हे जाणून घेऊयात.
हे ही वाचा : सुर्यकुमार यादव पाकिस्तानात जन्मला असता तर...माजी कर्णधाराची क्रिकेट बोर्डावर टीका
श्रीलंकेविरूद्ध वनडे मालिकेसाठी टीम इंडियाचा (Team India)संघ जाहीर झाला आहे. या संघात रोहित शर्मा आणि विराट कोहली (Virat Kohli) सारख्या सिनीयर खेळाडूंची वापसी होणार आहे. यासोबत टी20 त आपल्या वादळी खेळीने क्रिकेट जगताला आश्चर्यचकीत करणाऱ्या सुर्यकुमार यादव (Surykumar yadav) देखील वनडेत खेळताना दिसणार आहे.या मालिकेत सुर्यकुमार यादवला अनेक रेकॉर्ड ब्रेक करण्याची नामी संधी आहे.
2000 धावांचा टप्पा गाठणार
सूर्यकुमार यादव (Surykumar yadav) आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये 2000 धावा पूर्ण करण्यापासून फक्त 38 धावा दूर आहे. एकदिवसीय क्रिकेटमध्ये सूर्यकुमारने आतापर्यंत 384 धावा केल्या आहेत, तर टी-20 मध्ये त्याच्या नावावर 1678 धावा आहेत. म्हणजेच 38 धावा केल्यानंतर सूर्यकुमार यादवच्या (Surykumar yadav) आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये 2000 धावा पूर्ण होणार आहेत.त्यामुळे पहिल्याच सामन्यात त्याला हा टप्पा गाठण्याची संधी आहे.
वनडेतील पहिल्या सेंच्यूरीची प्रतिक्षा
टी-20 मालिकेतील तिसऱ्या सामन्यात सूर्यकुमार यादवने (Surykumar yadav) शतक झळकावून धमाका केला होता. आता वनडे मालिकेतही सूर्याकडून मोठ्या अपेक्षा असतील. सूर्याने आतापर्यंत वनडेत एकही शतक झळकावलेले नाही. सूर्या ज्या फॉर्ममध्ये दिसतोय, अशा स्थितीत एकदिवसीय मालिकेत सूर्यकुमार यादव वनडेतील पहिले शतक झळकावू शकेल, अशी अपेक्षा क्रिकेट फॅन्स व्यक्त करतायत.
दरम्यान तिसऱ्या टी20 सामन्यात सूर्यकुमार यादवने (surykumar yadav) पुन्हा एकदा अनपेक्षित अशी खेळी करून दाखवली आहे. सूर्याने 51 बॉलमध्ये नाबाद 112 धावा ठोकल्या आहेत. या खेळीत त्याने 7 फोर आणि 9 सिक्स लगावले आहेत. या खेळीने त्याने टी20 त तिसरे शतक ठोकले होते. आता वनडेतील त्याच्या शतकाची क्रिकेट फॅन्सना उत्सुकता आहे.
वनडे मालिकेचे वेळापत्रक
- पहिली वनडे- 10 जानेवारी, बारसापारा क्रिकेट स्टेडियम, गुवाहाटी
- दुसरी वनडे- 12 जानेवारी, इडन गॉर्डन, कोलकाता
- तिसरी वनडे- 15 जानेवारी, ग्रीनफिल्ड आंतरराष्ट्रीय स्टेडियम, तिरुवनंतपुरम
टीम इंडिया : रोहित शर्मा (कर्णधार), हार्दिक पंड्या (उपकर्णधार), शुभमन गिल, विराट कोहली, सूर्याकुमार यादव(Surykumar yadav), श्रेयस अय्यर, केएल राहुल, इशान किशन, वाशिंगटन सुंदर, युझवेंद्र चहल, कुलदीप यादव , अक्षर पटेल, मोहम्मद शमी, मोहम्मद सिराज, उमरान मलिक, अर्शदीप सिंह, जसप्रीत बुमराह