Ind vs Sl : तिसऱ्या वनडेपुर्वी टीम इंडियाला मोठा धक्का
Rahul Dravid India vs Sri lanka: टीम इंडिया आणि श्रीलंका (India vs Sri lanka)यांच्यातील तीन वनडे सामन्यांच्या मालिकेतील शेवटचा सामना 15 जानेवारी रोजी तिरुअनंतपुरम येथे खेळवला जाणार आहे. या सामन्यापूवी टीम इंडियासाठी धक्कादायक बातमी समोर आली आहे.प्रशिक्षक राहूल द्रविड (Rahul Dravid) यांची तबियत अचानक बिघडली आहे.
Rahul Dravid India vs Sri lanka: श्रीलंकेविरूद्दची तीन सामन्याची वनडे मालिका टीम इंडियाने (Team India)2-0 ने खिशात घातली आहे.आता फक्त तिसरा सामना बाकी आहे. या सामन्यापूर्वी टीम इंडियाला मोठा धक्का बसला आहे. कारण टीम इंडियाचे प्रशिक्षक राहूल द्रविड यांची तबियत अचानक बिघडली आहे. त्यामुळे आता तिसरा वनडे सामना टीम इंडियाला द्रविड य़ांच्या अनुपस्थित खेळावा लागण्याची शक्यता आहे.
टीम इंडिया आणि श्रीलंका (India vs Sri lanka)यांच्यातील तीन वनडे सामन्यांच्या मालिकेतील शेवटचा सामना 15 जानेवारी रोजी तिरुअनंतपुरम येथे खेळवला जाणार आहे. या सामन्यापूवी टीम इंडियासाठी धक्कादायक बातमी समोर आली आहे.प्रशिक्षक राहूल द्रविड (Rahul Dravid) यांची तबियत अचानक बिघडली आहे. शुक्रवारी सकाळी भारतीय संघ आणि उर्वरित सपोर्ट स्टाफ तिरुअनंतपुरमला तिसऱ्या सामन्यासाठी रवाना झाले होते. तर प्रशिक्षक राहुल द्रविड कोलकाताहून थेट बेंगळुरूला पोहोचले आहेत.
हे ही वाचा : ठरलं तर! तिसऱ्या वनडे सामन्यात सुर्यकुमार यादव खेळणार
मीडिया रिपोर्टनुसार, राहुल द्रविडची (Rahul Dravid) प्रकृती ठीक नाही. त्यामुळेच तो बंगळुरूला रवाना झाला आहे. द्रविडला रक्तदाबाची समस्या आहे, जी दुसऱ्या वनडेदरम्यान समोर आली होती. त्यानंतर बंगाल क्रिकेट असोसिएशनच्या डॉक्टरांनी त्यांची तपासणी केली होती.
बीसीसीआय़ काय म्हणाली?
बीसीसीआय़ने द्रविडच्या (Rahul Dravid) तबियतीबाबत आता माहिती दिली आहे. काळजी करण्यासारखे काहीही कारण नाही. ते शुक्रवारी पहाटे कोलकाताहून बेंगळुरूला रवाना झाले आहेत. पण तो पूर्णपणे फिट आहे. भारतीय संघ तिरुअनंतपुरममध्ये श्रीलंकेविरुद्ध मालिकेतील तिसरा एकदिवसीय सामना खेळणार आहे. हा सामना रविवारी होणार आहे, पण त्याआधी म्हणजेच शनिवारीच द्रविड तिरुअनंतपुरममध्ये संघात सामील होईल, असे बीसीसीआयच्या सूत्रांनी सांगितले आहे.
असा रंगला सामना
दुसरा एकदिवसीय सामन्यात नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करताना श्रीलंकेचा संघ 215 धावांत आटोपला. पदार्पणाचा सामना खेळणाऱ्या नुवानिडू फर्नांडोने 50 धावांची खेळी केली. तर कुलदीप यादव आणि मोहम्मद सिराज यांनी 3-3 महत्त्वपूर्ण विकेट घेतल्या. 216 धावांच्या लक्ष्याला प्रत्युत्तर देताना भारतीय संघाने 43.2 षटकांत 6 गडी गमावून सामना जिंकला. टीम इंडियाने (India vs Sri lanka)मालिकेतील पहिला सामना 67 धावांनी जिंकला होता. अशा प्रकारे टीम इंडियाने तीन सामन्यांची मालिका 2-0 ने जिंकली आहे.
दरम्यान टीम इंडियाने श्रीलंकेविरुद्ध (India vs Sri lanka)मायदेशात खेळल्या जाणाऱ्या तीन सामन्यांच्या वनडे मालिकेवर कब्जा केला आहे. टीम इंडियाने पहिले दोन सामने जिंकून मालिकेत 2-0 अशी अभेद्य आघाडी घेतली आहे. आता शेवटचा सामना तिरुअनंतपुरममध्ये रविवारी (15 जानेवारी) रंगणार आहे. या सामन्यात टीम इंडिया विजय मिळवून क्लीन स्वीप करते का हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.