IND vs SL 2nd ODI: इतिहास गवाह है! Team India च्या तुफानी खेळीनं कोलकात्यात वादळ, आजही उडतो श्रीलंकेचा थरकाप
IND vs SL 2nd ODI: रोहित शर्मानं जर चुकूनही त्याच फॉर्ममध्ये परत आला, तर आजही श्रीलंकेच्या संघाची खैर नाही. का ते एकदा वाचा मग लक्षात येईल
IND vs SL 2nd ODI LIVE: भारत आणि श्रीलंका (India vs Sri Lanka ODI) या दोन्ही संघांमध्ये खेळवल्या जाणाऱ्या तीन एकदिवसीय सामन्यांमध्ये पहिल्या सामन्यामध्ये भारतीय संघानं विजय मिळवून मालिकेत 1-0 नं आघाडी मिळवली. आता या दोन्ही संघांचा दुसरा सामना कोलकाता येथील (Eden Gardens Kolkata) इडन गार्डन्स स्टडियमवर खेळवला जाणार आहे. मालिकेतील पहिला सामना संघाच्या कर्णधारपदी असणाऱ्या (Rohit Sharma) रोहित शर्मा यानं गाजवला. तो शतक पूर्ण करू शकला नाही, पण त्यानं संघाला दमदार धावसंख्या उभारून दिली आणि रोहित पुन्हा फॉर्ममध्ये येतोय असं म्हणत क्रिकेटप्रेमींनी आनंद व्यक्त केला.
थोडंसं मागे वळून पाहताना, भारतीय संघाचं कराल कौतुक
मागच्या वेळी जेव्हा, 2014 मध्ये भारत आणि श्रीलंकेचा संघ इडन गार्डन्समध्ये खेळण्यासाठी आमनेसामने आला होता, त्यावेळी मैदानात जणू वादळच आलं होतं. एक असं वादळ, जे पाहून लंकेच्या गोलंदाजांना घाम फुटला होता. या वादळाचं नाव होतं रोहित शर्मा.
2014 च्या त्या सामन्यात रोहितनं 264 धावांचा डोंगर उभ केला होता. त्याच्या याच रुपाची एक झलक गुवाहाटीतील सामन्यात पाहायला मिळाली होती. अंगठ्याला झालेल्या दुखापतीनंतर रोहितनं केलेलं हे पुनरागमन पाहता सध्यातरी तो किमान निवृत्तीच्या विचारात किंवा तयारीतही नाही हेसुद्धा स्पष्ट होत आहे.
2014 मधील रोहितची खेळी डोळे दीपवणारी... (Rohit sharma innings 2014)
भारतीय संघानं 2014 च्या सामन्यात लंकेविरोधात खेळताना पहिल्यांदा फलंदाजी केली होती. संघानं पहिले दोन फलंदाज फार कमी वेळातच गमावले होते. यानंतर मात्र रोहितनं त्याचं कसब दाखवत संघाला चांगलंच सावरलं. त्या सामन्यामध्ये Team India चा दुसरा गडी 59 धावांवरच माघारी गेला होता. तर, तिसरा गडी म्हणन विराट (Virat Kohli) तंबूत परतला होता. तेव्हापर्यंत रोहित आणि विराटनं भागिदारीत 201 धावा केल्या होत्या. रोहितनं या सामन्यात 151 चेंडूंमध्ये तब्बल 200 धावा केल्या होत्या. एकदिवसीय क्रिकेटमध्ये दुसऱ्यांदा द्विशतक झळकावणारा रोहित शर्मा पहिलाच फलंदाज ठरला होता. यापूर्वी त्यानं 2013 मध्ये ऑस्ट्रेलियाविरोधात आपलं पहिलं द्विशतक पूर्ण केलं होतं.
रोहितनं लगावले 33 चौकर 9 षटकार...
रोहित शर्मानं त्या सामन्यामध्ये पहिल्या 101 चेंडूंमध्ये 100 धावा पूर्ण केल्या होत्या. त्यानं पुढच्या 100 धावा 50 चेंडूंमध्ये केल्या. 50 व्या ओव्हरमध्ये शेवटच्या चेंडूवर त्याच्या या खेळीची समाप्ती झाली. जोपर्यंत त्याच्या 264 धावा पूर्ण झाल्या होत्या. पाहतच राहावी अशी ही त्याची खेळी बऱ्याच कारणांनी खास होती. यामध्ये त्यानं 33 चौकार आणि 9 षटकार लगावले होते. रोहितनं या सामन्यात 150 च्या स्ट्राईक रेटनं खेळत संपूर्ण जगभरातील क्रिकेटप्रेमींची वाहवा मिळवली होती. तेव्हा आजही तो कोलकात्यामध्ये याच क्षणाची पुनरावृत्ती करणार का हे पाहणं औत्सुक्याचं ठरेल.