Rohit Sharma | विराटकडून या खेळाडूकडे वारंवार दुर्लक्ष, रोहित शर्माकडून कर्णधार होताच संधी
रोहित शर्मा (Rohit Sharma) आता टीम इंडियाच्या (Team India) तिन्ही फॉर्मेटचा कर्णधार झाला आहे. रोहित शर्मा युवा खेळाडूंना संधी देण्यासाठी ओळखला जातो.
मुंबई: रोहित शर्मा (Rohit Sharma) आता टीम इंडियाच्या (Team India) तिन्ही फॉर्मेटचा कर्णधार झाला आहे. रोहित शर्मा युवा खेळाडूंना संधी देण्यासाठी ओळखला जातो. टीम इंडिया आता श्रीलंका विरुद्ध टी 20 आणि टेस्ट सीरिज (Sri Lanka Tour Of Team India 2022) खेळणार आहे. या मालिकेसाठी टीम इंडियाची घोषणा केली आहे. रोहित शर्मा युवा खेळाडूंना संधी देण्यासाठी ओळखला जातो. (ind vs sl t 20 series team india star wicketkeepar batsman sanju samson comes team india t 20 squad)
रोहितने श्रीलंका विरुद्धच्या मालिकेसाठी अशाच एका स्टार विकेटकीपर बॅट्समनला संधी दिली आहे. या संधीमुळे खेळाडूचं संघात पुन्हा पुनरागमन झालं आहे. या खेळाडूला विराट कोहली कॅप्टन असताना खेळण्याची फार संधी मिळाली नव्हती.
या खेळाडूचं कमबॅक
श्रीलंका विरुद्धच्या टी 20 मालिकेसाठी विकेटकीपर बॅट्समन संजू सॅमसनला (Sanju Samson) संधी देण्यात आली आहे. संजूने आयपीएलमध्ये (IPL) अनेकदा आपली उपयुक्तता सिद्ध करुन दाखवली आहे. त्याने राजस्थानकडून खेळताना बॅटिंग, कॅप्टन आणि विकेटकीपिंग अशा तिन्ही जबाबदाऱ्या सार्थपणा पार पाडल्या आहेत. आता रोहितने कर्णधार होताच संजूला टीममध्ये घेतलं आहे.
कोहलीकडून दुर्लक्ष
विराटने कर्णधार असताना संजूला फार संधी दिली नाही. तसेच निवड समितीनेही संजूला संधी देण्याबाबत फार विचार केला नाही. विराटच्या कॅप्टन्सीमध्ये रिषभ पंतला अनेकदा संधी मिळाली.
क्रिकेट विश्लेषकांनुसार, संजूला संधी मिळाली तर तो नक्कीच त्याचं सोनं करेल. संजू मैदानात एकदा सेट झालो की तो गोलंदाजांचां चांगलाच समाचार घेतो. त्याची फटकेबाजी अनेकांनी आयपीएलमध्ये पाहिली आहे.
त्यामुळे आता रोहितच्या नेतृत्वात संजू त्याच्या लौकीकाला साजेशी कामगिरी करेल, अशी आशा त्याच्या चाहत्यांकडून व्यक्त केली जात आहे. संजू टीम इंडियाकडून अखेरचा जुलै 2021 मध्ये खेळला होता. तेव्हा टीम इंडिया राहुल द्रविडच्या मार्गदर्शनाखाली श्रीलंका दौऱ्यावर गेली होती. मात्र संजूला तेव्हा प्लेइंग इलेव्हनमध्ये संधी मिळाली नव्हती.
संजूने आयपीएलमध्ये एकूण 121 सामन्यात 2 अर्धशतकांच्या मदतीने 3 हजार 68 धावा केल्या आहेत. तर टीम इंडियाकडून खेळताना त्याने 1 वनडे आणि 10 टी 20 सामन्यात प्रतिनिधित्व केलं आहे.
टी 20 सीरिजसाठी टीम इंडिया : रोहित शर्मा (कॅप्टन), जसप्रीत बुमराह (उपकर्णधार), ऋतुराज गायकवाड, श्रेयस अय्यर, सूर्यकुमार यादव, संजू सॅमसन, इशान किशन (विकेटकीपर), व्यंकटेश अय्यर, दीपक चहर, दीपक हुडा, रवींद्र जाडेजा, युजवेंद्र चहल, रवी बिश्नोई, कुलदीप यादव, मोहम्मद सिराज, भुवनेश्वर कुमार, हर्षल पटेल आणि आवेश खान.
कसोटी मालिकेसाठी टीम इंडिया : रोहित शर्मा (कर्णधार), जसप्रीत बुमराह (उपकर्णधार), प्रियांक पांचाळ, मयंक अग्रवाल, विराट कोहली, श्रेयस अय्यर, हनुमा विहारी, शुबमन गिल, ऋषभ पंत (विकेटकीपर), केएस भरत, रवींद्र जाडेजा, जयंत यादव, आर अश्विन, कुलदीप यादव, सौरभ कुमार, मोहम्मद सिराज, उमेश यादव आणि मोहम्मद शमी.