मुंबई : टीम इंडिया विरुद्ध श्रीलंका (Team India vs Sri Lanka T20I Series) यांच्यात उद्यापासन (24 फेब्रुवारी) 3 सामन्यांच्या मालिकेला सुरुवात होणार आहे. पहिला सामना हा लखनऊमध्ये खेळवण्यात येणार आहे. या आधी टीम इंडियाच्या गोटात घातक खेळाडूची एन्ट्री झाली आहे. ज्यामुळे श्रीलंकेचे धाबे दणाणले आहेत. श्रीलंका विरुद्धच्या मालिकेतील 3 सामने हे अनुक्रमे 24, 26 आणि 27 फेब्रुवारीला खेळवण्यात येणार आहे. टीम इंडियाने विंडिजला टी 20 मालिकेत 3-0 ने क्लीन स्वीप दिला. त्यानुसार टीम इंडिया श्रीलंकेचाही असाच सूपडा साफ करण्याच्या तयारीत आहे. (ind vs sl t 20i series team india star allrounder player comeback in squad against sri lanka series)    


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

टीममध्ये मॅचविनर खेळाडूची एन्ट्री


टीम इंडियामध्ये या खेळाडूचं कमबॅक झालं आहे. यामुळे श्रीलंकेचं टेन्शन वाढलं आहे. ऑलराऊंडर रवींद्र जाडेजाचं (Ravindra Jadeja) संघात कमबॅक झालं आहे. जाडेजा बॅटिंग, बॉलिंग आणि फिल्डिंग अशा तिन्ही आघाड्यांवर शानदार कामगिरी करतो. जाडेजात सामना एकहाती फिरवण्याची क्षमता आहे. 


सूर्यकुमार यादवला दुखापत झाल्याने तो या टी 20 मालिकेतून बाहेर झाला आहे. त्यामुळे जाडेजाला सहाव्या स्थानी फिनीशरची भूमिका वठवू शकतो. श्रीलंका विरुद्ध विजय मिळवण्यासाठी रवींद्र जाडेजाचं योगदान हे निर्णायक ठरणार आहे. दरम्यान जाडेजा आता मोठ्या कमबॅकनंतर कशी कामगिरी करतो, याकडे सर्वांचच लक्ष असणार आहे.   
 
रोहितला कठोर निर्णय घ्यावे लागणार


जाडेजाच्या कमबॅकमुळे कॅप्टन रोहित शर्माला काही कठोर निर्णय घ्यावे लागणार आहेत. जाडेजाच्या अनुपस्थितीत टीममध्ये शार्दुल ठाकूर, दीपक चाहर आणि वेंकटेश अय्यर यांना ऑलराऊंडर म्हणून संधी देण्यात आली. या तिघांनी संधीचं सोनं केलं. या तिघांनी अष्टपैलू कामगिरी केली. 


तसेच स्पिनर म्हणून युजवेंद्र चहल आणि रवी बिश्नोई यांना संधी देण्यात आली. मात्र जड्डू ऑलराऊंडर असल्याने आता कोणाला तरी बाहेर बसावं लागणार आहे. त्यामुळे कोणाला तरी बलिदान द्यावं लागेल. यामुळे रोहितला कोणा एका खेळाडूला संघाबाहेर बसवण्याचा कठोर निर्णय घ्यावा लागणार आहे. त्यामुळे आता कॅप्टन रोहित जाडेजासाठी कोणाला बेंचवर ठेवणार, हे लवकरच समजेल.  


टी 20 सीरिजसाठी टीम इंडिया : रोहित शर्मा (कॅप्टन), जसप्रीत बुमराह (उपकर्णधार), ऋतुराज गायकवाड, श्रेयस अय्यर, संजू सॅमसन, इशान किशन (विकेटकीपर), व्यंकटेश अय्यर, दीपक हुडा, रवींद्र जाडेजा, युजवेंद्र चहल, रवी बिश्नोई, कुलदीप यादव, मोहम्मद सिराज, भुवनेश्वर कुमार, हर्षल पटेल आणि आवेश खान.