IND vs SL | टीम इंडियाचं ठरलं! वर्ल्ड कपमध्ये हा घातक बॅट्समन चौथ्या क्रंमांकावर खेळणार
टीम इंडियाने श्रीलंकेवर (IND vs SL T 20I Series) पहिल्या टी 20 सामन्यात 62 धावांनी विजय मिळवला.
मुंबई : टीम इंडियाने श्रीलंकेवर (IND vs SL T 20I Series) पहिल्या टी 20 सामन्यात 62 धावांनी विजय मिळवला. या विजयासह टीम इंडियाने 3 सामन्यांच्या मालिकेत 1-0 अशी आघाडी घेतली. टीम इंडियाच्या प्लेइंग इलेव्हनमध्ये कॅप्टन रोहित शर्मा (Rohit Sharma) सातत्याने एक प्रयोग करतोय. रोहित प्रत्येक सामन्यात युवा खेळाडूंना संधी देतोय. या प्रयोगाचा फायदा टीम इंडियाला आगामी टी 20 वर्ल्ड कपसाठी नक्कीच होईल. रोहित वर्ल्ड कपच्या दृष्टीने युवा खेळाडूंच्या मदतीने टीम इंडियाची मोट बांधतोय. (ind vs sl t20i series team india captain rohit sharma will send ravindra jadeja on 4th positon for batting upcoming series)
रोहितने लंका विरुद्धच्या पहिल्या टी 20 मध्ये असा मोठा बदल केला ज्यामुळे सर्वच चकित झाले. रोहितने केलेला हा बदलाचा प्रयोग यशस्वीही ठरला. रोहितने चौथ्या क्रमांकावर बँटिंगसाठी परफेक्ट खेळाडूची निवड केली आहे.
प्रत्येक टीमचा मीडल ऑर्डर हा कणा असतो. टीम इंडियाच्या मीडल ऑर्डरला गेल्या काही वर्षांपासून सातत्याने संघर्ष करावा लागतोय. अनेक फलंदाजांना त्या स्थानी खेळवण्या आलं. मात्र टीम इंडियाचा हा स्थानासाठीचा शोध अजून सुरु आहे.
रोहितने या चौथ्या क्रमांकासाठी मोठा प्रयोग केला अन् तो यशस्वी ठरला. या क्रमांकावर रोहितने ऑलराऊंडरला उतरवण्याचा निर्णय घेतला आहे. श्रीलंका विरुद्धच्या पहिल्या टी 20 सामन्यात रोहितने चौथ्या क्रमांकावर रवींद्र जाडेजाला (Ravindra Jadeja) बॅटिंगसाठी पाठवलं. ज्यामुळे सर्वच चकित झाले. रोहितला हा प्रयोग पुढे ही सुरु ठेवायचा आहे. याबाबत स्वत: रोहितने प्रतिक्रिया दिली आहे.
रोहित काय म्हणाला?
जाडेजाच्या कमबॅकमुळे मी खूप आनंदी आहे. जाडेजाच्या खेळाचा आम्ही पुरेपुर फायदा घेऊ इच्छितो. त्यामुळेच जाडेजाला चौथ्या क्रमांकावर बॅटिंगसाठी पाठवलं. आगामी मालिकांमध्येही तुम्ही जाडेजाला वरच्या क्रमांकावर खेळताना पाहाल. जाडेजाच्या बॅटिंगमध्ये खूप चांगला आणि अपेक्षित बदल झाला आहे. जाडेजा चांगली कामगिरी करतोय. जाडेजाचा टेस्टनंतर आता व्हाईट बॉल क्रिकेटमध्येही त्याच्या कामगिरीचा फायदा घ्यायचा आहे", असं रोहित म्हणाला. रोहित पहिल्या सामन्यानंतर बोलत होता.