मुंबई : टी 20 मालिकेत श्रीलंकेला क्लीन स्वीप दिल्यानंतर टीम इंडिया कसोटी मालिका (IND vs SL Test Series) खेळण्यासाठी सज्ज झाली आहे. टीम इंडिया (Team India) विरुद्ध श्रीलंका यांच्यात 2 सामन्यांची कसोटी मालिका खेळवण्यात येणार आहे. या मालिकेतील पहिला सामना हा  4 मार्चपासून खेळवण्यात येणार आहे. रोहित शर्मा (Rohit Sharma) या सामन्यातून आपल्या कॅप्टन्सीच्या (Team India Captain) नव्या इनिंगला सुरुवात करणार आहे. (ind vs sl test series team india captain rohit sharma might give chance to k s bharat debut  against sri lanka)


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

रोहित युवा खेळाडूंना संधी देण्यासाठी ओळखला जातो. रोहितने आतापर्यंत अनेक युवा खेळाडूंना संधी दिली आहे. रोहित या कसोटी मालिकेत अशाच एका स्टार विकेटकीपर खेळाडूला संधी देऊ शकतो, ज्याच्याकडे विराटने कॅप्टन असताना दुर्लक्ष केलं होतं.


या खेळाडूमध्ये निर्णायक क्षणी सामना आपल्या बाजूने फिरवण्याची क्षमता आहे. या खेळाडूची या कसोटी मालिकेसाठी निवड करण्यात आली आहे. केएस भरत (K S Bharat) असं या खेळाडूचं नाव आहे. रोहित केएसला संधी देऊ शकतो. रोहितने संधी दिल्यास केएसचं कसोटी पदार्पण ठरु शकतं.


पदार्पणाआधीच 3 जणांची शिकार


केएस भरतने विकेटकीपिंगची झलक दाखवली. टीम इंडिया विरुद्ध न्यूझीलंड यांच्यात कानपूरमध्ये पहिला कसोटी सामना खेळवण्यात आला. या सामन्यात रिद्धीमान साहा विकेटकीपर होता. 


साहाला दुखापत झाल्याने केएसला सब्टीट्यूड विकेटकीपर म्हणून संधी मिळाली. त्याने या संधीचं सोनं केलं. केएसने स्टंपमागून न्यूझीलंडच्या 3 बॅट्समनना मैदानाबाहेरचा रस्ता दाखवला. केएसने 2 फलंदाजांना कॅच आऊट तर एकाला स्टंपिंग आऊट केलं होतं. 


केएसने विल यंगची घेतलेली जबराट कॅच ही आजही प्रत्येक टीम इंडियाच्या चाहत्याच्या लक्षात आहे. या कॅचसाठी केएसचं भरभरुन कौतुक करण्यात आलं. 


त्यामुळे आता रोहित केएसमधील प्रतिभा ओळखन टेस्ट डेब्यू करण्याची संधी देईल, अशी आशा व्यक्त केली जात आहे.  


कसोटी मालिकेसाठी टीम इंडिया :  रोहित शर्मा (कर्णधार), जसप्रीत बुमराह (उपकर्णधार), प्रियांक पांचाळ, मयंक अग्रवाल, विराट कोहली, श्रेयस अय्यर, हनुमा विहारी, शुबमन गिल, ऋषभ पंत (विकेटकीपर), केएस भरत, रवींद्र जाडेजा, जयंत यादव, आर अश्विन, कुलदीप यादव, सौरभ कुमार, मोहम्मद सिराज, उमेश यादव आणि मोहम्मद शमी.