IND vs SL : पहिली टेस्ट जिंकूनही टीम इंडियाचा हा खेळाडू ठरला व्हिलन
पहिली टेस्ट जिंकूनही टीम इंडियाचा हा खेळाडू ठरला व्हिलन, रोहित दुसऱ्या सामन्यात डच्चू देणार?
मुंबई: कसोटी क्रिकेटच्या कर्णधारपदाची सूत्र रोहित शर्माच्या हाती आल्यानंतर टीम इंडियासाठी चांगले दिवस आले आहेत. श्रीलंकेविरुद्धची टी 20 सीरिज पाठोपाठ आता पहिला कसोटी सामनाही जिंकला आहे. टीम इंडियाने 1-0 ने आघाडी घेतली आहे. दुसऱ्या टी 20 सामन्याआधी एक मोठी बातमी येत आहे.
टीम इंडियाने पहिला कसोटी सामना 222 धावांनी जिंकला. सामना जिंकूनही एक खेळाडू मात्र टीम इंडियामध्ये व्हिलन ठरला आहे. त्यामुळे दुसऱ्या कसोटी सामन्यात रोहित शर्मा या खेळाडूला बाहेरचा रस्ता दाखवणार असल्याची शक्यता आहे.
जयंत यादवला प्लेइंग इलेव्हनमध्ये संधी दिली मात्र त्याने चांगली कामगिरी केली नाही. त्याचा खराब फॉर्म पाहता दुसऱ्या सामन्यातून त्याला बाहेरचा रस्ता दाखवण्यात येण्याची शक्यता आहे. जयंतला एकही विकेट घेण्यात यश आलं नाही. एवढंच नाही तर त्याने धावाही जास्त दिल्या आहेत. त्यामुळे त्याला पुन्हा संघात स्थान मिळेल की नाही याबाबत सध्या शंका आहे.
जयंत यादव ऐवजी संघामध्ये अक्षर पटेलला संधी दिली जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे रोहित शर्मा अक्षर पटेलला ही संधी देऊ शकतो अशी चर्चा आहे. कुलदीप यादवला संघातून वगळण्यात आलं.
अक्षर दुखापतीमुळे संघाबाहेर होता. त्यामुळे त्याच्या जागी कुलदीप यादवला संधी देण्यात आली होती. मात्र आता अक्षर दुखापतीतून सावरल्याने त्याचं संघात पुनरागमन झालंय. तर कुलदीपला नेहमी प्रमाणे संघाबाहेर बसावं लागलं आहे.
टीम इंडिया 2 सामन्यांच्या मालिकेत 1-0 ने आघाडीवर आहे. त्यामुळे टीम इंडिया दुसऱ्या सामना जिंकून श्रीलंकेला व्हाईट वॉश देण्याच्या प्रयत्नात असेल. तर दुसऱ्या बाजूला श्रीलंका भारतात पहिला कसोटी विजयासाठी जोरदार प्रयत्न करेल.