मुंबई : श्रीलंका विरूद्ध भारत टी-20 सिरीज असून आज धर्मशालामध्ये दुसरा सामना रंगणार आहे. पहिला सामना टीम इंडियाने जिंकून सिरीजमध्ये 1-0 अशी आघाडी घेतली आहे. अशातच आजचा सामना जिंकल्यास टीम इंडिया सिरीज जिंकू शकते. आणि यासाठी कर्णधार रोहित शर्मा सगळे प्रयत्न करणार आहे. त्यामुळे आजच्या सामन्यात टीममध्ये काही मोठे बदल होण्याची शक्यता आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

पहिल्या टी-20 सामन्यात ओपनिंगला रोहित शर्मा आणि इशान किशन उतरले होते. दोघांनी 111 रन्सची पार्टनरशिप केली होती. त्यानुसार दुसऱ्या टी-20 मध्ये ही जोडी बदलण्यात येणार नाही. तिसऱ्या नंबरवर श्रेयस अय्यरला खेळू शकले. गेल्या सामन्यात त्याने 52 रन्सची खेळी केली होती. 


चौथ्या नंबरवरदीपक हुड्डा उतरणार आहे. पहिल्या सामन्यात त्याला फलंदाजीसाठी संधी मिळाली नाही. मात्र गोलंदाजीमध्ये त्याने कमाल केली. त्याने 3 ओव्हरमध्ये 28 रन्स दिले होते. त्यानंतर पाचव्या नंबरवर संजू सॅमसनचा संधी दिली जाऊ शकते. तर सहाव्या स्थानावर वेंकटेश अय्यरला पुन्हा संधी मिळण्याची शक्यता आहे.


सातव्या नंबर रोहित शर्मा रवींद्र जडेजाला संधी देईल. तर आजच्या दुसऱ्या सामन्यात युझवेंद्र चहलला बाहेरचा रस्ता दाखवला जाऊ शकतो. चहलच्या जागी कुलदीप यादवला संधी देण्यात येईल. गेल्या काही सामन्यांमध्ये कुलदीप यादवने चांगला खेळ करून दाखवला आहे.


टीम इंडियाचं संभाव्य प्लेईंग 11


रोहित शर्मा, ईशान किशन, श्रेयस अय्यर, दीपक हुड्डा, वेंकटेश अय्यर, संजू सॅमसन, रवींद्र जडेजा, कुलदीप यादव, जसप्रीत बुमराह, भुवनेश्वर कुमार, हर्षल पटेल.