IND vs USA Probable Playing XI : डिफेन्डिंग फायनलिस्ट पाकिस्तानचा पराभव करून टीम इंडियाने सुपर 8 चं स्थान जवळजवळ पक्क केलंय. सलग दोन सामने जिंकल्यानंतर आता टीम इंडियाचा आगामी सामना यजमान युएसएविरुद्ध (IND vs USA) असणार आहे. युएसएविरुद्धचा सामना जिंकला तर टीम इंडियाची आगामी शेड्यूल फिक्स होईल. मात्र, युएसएला हलक्यात घेऊन चालणार नाही. याच युएसएने पाकिस्तानचा सुपर ओव्हरमध्ये पराभव केलाय. त्यामुळे आता टीम इंडियाच्या रणनितीवर सर्वांचं लक्ष आहे. मागील दोन सामने जिंकणारी टीम इंडिया अमेरिकेविरुद्धच्या प्लेईंग इलेव्हनमध्ये काही बदल करणार का? असा सवाल विचारला जातोय. अशातच रोहित शर्मा मोठा निर्णय घेण्याची शक्यता आहे. 


रोहित शर्माची चालाख खेळी


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

टीम इंडिया सध्या उत्तम कामगिरी करत असती तरी संघाच्या फलंदाजीमध्ये काही तुटी अजूनही आहेत. रोहित शर्मा आणि विराट कोहली सलामीला येत असल्याने मिडल ऑर्डरमध्ये मोठी पोकळी निर्माण झाली आहे. मिडल ऑर्डरमध्ये सुर्या आणि ऋषभ पंत असले तरी देखील स्लो खेळपट्टीवर संयमी खेळ करणाऱ्या एका खेळाडूची गरज आहे. त्यामुळे संजू सॅमसनला संधी दिली जाण्याची शक्यता आहे. खराब फॉर्म असलेल्या शिवम दुबेला प्लेइंग इलेव्हनमधून वगळले जाऊ शकते. जर दुबे संघाबाहेर असेल, तर या स्थितीत संजू सॅमसन किंवा यशस्वी जयस्वाल यांच्यापैकी एकाला खेळण्याची संधी मिळू शकते.


भारतीय वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह, अर्शदीप सिंग, मोहम्मद सिराज चांगली कामगिरी करत असून हार्दिक पांड्याची गोलंदाजी देखील चांगली दिसत आहे. त्यामुळे हार्दिक पांड्याला प्लेईंग इलेव्हनमध्ये कायम ठेवावं लागेल. तर शिवम दुबेला गोलंदाजी करण्याची संधी मिळाली नाही. त्यामुळे त्याचा संधी मिळेल की नाही? यावर अद्याप प्रश्नचिन्ह आहे. तसेच फिरकीच्या डिपार्टमेंटमध्ये जडेजा आणि अक्षर यांचा मारा अचूक बसल नसला तरी रन रोखण्याची ताकद दोन्ही गोलंदाजांमध्ये आहे. अक्षरने पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यात महत्त्वाची भूमिका निभावली होती.


वर्ल्ड कपसाठी टीम इंडिया - रोहित शर्मा (कर्णधार), हार्दिक पंड्या (उपकर्णधार), यशस्वी जयस्वाल, विराट कोहली, सूर्यकुमार यादव, ऋषभ पंत, संजू सॅमसन, शिवम दुबे, रवींद्र जडेजा, अक्षर पटेल, कुलदीप यादव, युझवेंद्र चहल, अर्शदीप सिंग, जसप्रीत बुमराह, मोहम्मद सिराज.


वर्ल्ड कपसाठी यूएसएचा संघ - मोनांक पटेल (कर्णधार), आरोन जोन्स, अँड्रिज गॉस, कोरी अँडरसन, अली खान, हरमीत सिंग, जेसी सिंग, मिलिंद कुमार, निसर्ग पटेल, नितीश कुमार, नोश्टुश केंजिगे, सौरभ नेथ्रालवकर, शॅडली व्हॅन शाल्क्विक, स्टीव्हन टेलर, शायन जहांगीर.