कोलकाता : वेस्ट इंडिजने (West Indies) टीम इंडियाला (Team India) विजयासाठी 158 धावांचे आव्हान दिले आहे. विंडिजने निर्धारित 20 ओव्हरमध्ये 7 विकेट्स गमावून 157 धावा केल्या. विंडिजकडून निकोलस पूरने  सर्वाधिक 61 धावांची खेळी केली. तर काइल मेयर्सने 31 धावांची खेळी केली. या व्यतिरिक्त विंडिजच्या फलंदाजांना विशेष काही करता आलं नाही. (ind vs wi 1st t 20i west indies set 158 target for wining to team india at eden garden kolkata)


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

टीम इंडियाकडून पदार्पणवीर रवी बिश्नोई (Ravi Bishnoi) आणि हर्षल पटेल (Harshal Patel) या जोडीने प्रत्येकी 2 विकेट्स घेतल्या. तर  भुवनेश्वर कुमार, दीपक चहर आणि युझवेंद्र चहलने प्रत्येकी 1 फलंदाजाला मैदानाबाहेरचा रस्ता दाखवला. 


टीम इंडिया प्लेइंग इलेव्हन : रोहित शर्मा (कर्णधार), ईशान किशन, विराट कोहली, सूर्यकुमार यादव, रिषभ पंत (विकेटकीपर), श्रेयस अय्यर, दीपक चाहर, हर्षल पटेल, बी कुमार, युजवेंद्र चहल आणि रवी बिश्नोई 


वेस्ट इंडिजचे शिलेदार :  ब्रँडन किंग, काइल मेयर्स, निकोलस पूरन (विकेटकीपर), रोव्हमन पॉवेल, किरॉन पोलार्ड (कॅप्टन), रोस्टन चेस, रोमॅरियो शेफर्ड, अकेल होसेन, ओडियन स्मिथ, फॅबियन ऍलन आणि शेल्डन कॉट्रेल.