Ind Vs Wi 2nd T-20: भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यात शुक्रवारी कोलकाता येथे झालेल्या दुसऱ्या T20 सामन्यात भारताने रोमहर्षक विजय मिळवला. टीम इंडियाने प्रथम फलंदाजी करताना मोठी धावसंख्या उभारली, मात्र वेस्ट इंडिजच्या दमदार फलंदाजीमुळे हा सामना रोमांचक वळणावर पोहोचला.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

टीम इंडियाने अखेर हा सामना 8 धावांनी जिंकला. भारताने तीन सामन्यांच्या मालिकेत 2-0 अशी अभेद्य आघाडी घेतली आहे, 20 तारखेला या मैदानावर तिसरा सामना खेळला जाईल आणि टीम इंडियाच्या नजरा क्लीन स्वीपवर असतील.


वेस्ट इंडिजला शेवटच्या षटकात 25 धावांची गरज होती, भारताकडून हर्षल पटेल गोलंदाजी करत होता. वेस्ट इंडिजनेही दोन सिक्स मारले. पण शेवटी टीम इंडियाचाच विजय झाला. रोव्हमन पॉवेल आणि किरन पोलार्ड फलंदाजी करत असल्याने टीम इंडियाचे फॅन्स देखील चिंतेत होते.


शेवटची ओव्हर - 6 बॉल, 25 धावांची गरज


• 19.1 : पॉवेलने एक रन घेतला
• 19.2 : पोलार्डने एक रन घेतला
• 19.3 : पॉवेलने सिक्स मारला
• 19.4 : पॉवेलने सिक्स ठोकला
• 19.5 : पॉवेलने एक रन घेतला
• 19.6 : पोलार्डने एक रन घेतला


भारताने हा सामना 8 धावांनी जिंकला. तीन सामन्यांच्या मालिकेत 2-0 अशी आघाडी घेत मालिकाही जिंकली.


वेस्ट इंडिजला शेवटच्या 3 षटकात 37 धावांची गरज होती, त्यावेळी निकोलस पूरन आणि रोव्हमन पॉवेल क्रीझवर होते जे बराच वेळ फलंदाजी करत होते. अशा परिस्थितीत भारतासाठी कठीण काळ होता, परंतु 18 व्या षटकात हर्षल पटेलने केवळ 8 धावा दिल्या, त्यानंतर भुवनेश्वर कुमारने 19 व्या षटकात केवळ 4 धावा दिल्या आणि एक विकेट घेतली.


भारत - 186/5, 20 ओव्हर
वेस्ट इंडिज - 178/3, 20 ओव्हर