IND vs WI: ऋषभ पंतवर संतापला कर्णधार रोहित शर्मा, पाहा Video
भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यात सामना रंगत आहे. या वेळी रोहित शर्मा ऋषभ पंतवर वैतागला.
मुंबई : भारतीय संघाने चौथ्या टी-20 सामन्यात विंडीजचा 59 धावांनी एकतर्फी पराभव केला. या विजयासह रोहित ब्रिगेडने T20I मालिकेत 3-1 अशी अभेद्य आघाडी घेतली. आता उभय संघांमधील पाचवा आणि अंतिम सामना 7 ऑगस्ट (रविवार) रोजी फ्लोरिडामधील लॉडरहिल येथील सेंट्रल ब्रॉवर्ड पार्क येथे खेळला जात आहे.
ऋषभ पंतची विकेटकीपिंगची वेगळी शैली आहे आणि तो विकेटच्या मागे गोलंदाजांना मजेदार सल्ले देताना दिसतो. चौथ्या T20 सामन्यादरम्यान ऋषभ पंत विकेटकीपिंगसाठी चर्चेत राहिला. विंडीजच्या इनिंगमध्ये ऋषभ पंतने असे कृत्य केले होते, ज्यामुळे कर्णधार रोहित शर्माचा राग अनावर झाला आणि त्याने पंतला सुनावलं. डावाच्या पाचव्या षटकात ही घटना घडली.
षटकाच्या शेवटच्या चेंडूवर वेस्ट इंडिजचा कर्णधार निकोलस पूरन धाव घेण्याच्या प्रयत्नात होता पण ऑफ साइडला उभ्या असलेल्या संजू सॅमसनने चेंडू झेलला आणि स्ट्रायकरच्या शेवटी ऋषभ पंतला दिला.
दुसरीकडे, निकोल्सलाही माहित होते की तो क्रिझपर्यंत पोहोचू शकत नाही, अशा परिस्थितीत पंतने चेंडू हातात असूनही काही सेकंदांसाठी पूरनला धावबाद केले नाही. पंतच्या या कृतीचा रोहित शर्माला राग आला आणि तो त्याला काहीतरी समजावताना दिसला.
भारतीय कर्णधार रोहित शर्माने चौथ्या T20 मध्ये 33 धावा केल्या. या खेळीदरम्यान रोहितने दोन विक्रम आपल्या नावावर केले होते. एक विक्रम असा होता की रोहित शर्मा आता आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक षटकार मारण्याच्या बाबतीत दुसऱ्या क्रमांकावर आला आहे. त्याने या प्रकरणात पाकिस्तानचा माजी कर्णधार शाहिद आफ्रिदीचा विक्रम मोडला. यासह त्याने या डावात आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये 16 हजार धावाही पूर्ण केल्या.