Ind vs WI: 49 वर्षांत पहिल्यांदाच! रवींद्र जाडेजा आणि कुलदीप यादवने रचला जबरदस्त रेकॉर्ड
Ind vs WI: वेस्ट इंडिजविरोधातील (West Indies) पहिल्या एकदिवसीय सामन्यात पराभव करत मालिकेची विजयी सुरुवात केली आहे. एकतर्फी झालेल्या या सामन्यात भारताने सहजपणे विजय मिळवला. या सामन्यात भारताने अनेक रेकॉर्ड रचले. दरम्यान, रवींद्र जाडेजा (Ravindra Jadeja) आणि कुलदीप यादव (Kuldeep Yadav) यांनी अशा एका रेकॉर्डची नोंद केली आहे, जो 49 वर्षात पहिल्यांदाच झाला आहे.
Ind vs WI: वेस्ट इंडिजविरोधातील (West Indies) पहिल्या एकदिवसीय सामन्यात पराभव करत मालिकेची विजयी सुरुवात केली आहे. वेस्ट इंडिजने भारतासमोर फक्त 115 धावांचं आव्हान ठेवलं होतं. दरम्यान एकतर्फी झालेल्या या सामन्यात भारताने सहजपणे विजय मिळवला. भारताने फक्त 22.5 ओव्हर्समध्येच विजय नोंदवला. या सामन्यात भारताने अनेक रेकॉर्ड रचले. रवींद्र जाडेजा (Ravindra Jadeja) आणि कुलदीप यादव (Kuldeep Yadav) यांनी तर अशा एका रेकॉर्डची नोंद केली आहे, जो 49 वर्षात पहिल्यांदाच झाला आहे.
भारतीय फिरकी गोलंदाज रवींद्र जाडेजा आणि कुलदीप यादव यांनी पहिल्या एकदिवसीय सामन्यात एकूण सात विकेट घेतले. एकदिवसीय सामन्यात 7 किंवा त्यापेक्षा अधिक विकेट घेणारी ही पहिली लेफ्ट-स्पिन गोलंदाजाची जोडी ठरली आहे. गुरुवारी वेस्ट इंडिजविरोधातील पहिल्या सामन्यात त्यांनी या रेकॉर्डला गवसणी घातली.
या सामन्यात कुलदीप यादवने आपल्या करिअरमधील सर्वोत्कृष्ट रेकॉर्ड्सपैकी एका रेकॉर्डची नोंद केली. कुलदीपने फक्त 6 धावा देत 4 विकेट्स घेतल्या. तर दुसरीकडे जाडेजाने 37 धावा घेत 3 विकेट्स घेतल्या. "आम्हाला 7 विकेट मिळाल्याचा आनंद आहे. खेळपट्टीवर चेंडू फिरत होता तसंच बाउन्सही होत होता. स्पर्धा असणं नेहमीच चांगलं असतं. आम्ही फक्त एकत्र काम करण्याचा प्रयत्न करतो," असं कुलदीप सामन्यानंतर म्हणाला.
कुलदीप आणि रवींद्र जाडेजाने केलेल्या जबरदस्ती गोलंदाजीच्या बळावर भारताने वेस्ट इंडिजला फक्त 115 धावातच गारद केलं. त्यासह एकदिवसीय क्रिकेटमधील आपल्या सलग नवव्या विजयाची नोंद केली.
दरम्यान वेस्ट इंडिजची एकदिवसीय क्रिकेटमध्ये भारताविरोधातील ही त्यांची सर्वात कमी असणारी दुसरी धावसंख्या आहे. दुसरीकडे, घरच्या मैदानावर भारताविरोधातील ही त्यांची सर्वात कमी धावसंख्या ठरली. याआधी 1997 मध्ये पोर्ट ऑफ स्पेनच्या मैदानावर संघ फक्त 121 धावा करु शकला होता.
वेस्ट इंडिजची भारताविरोधातील एकदिवसीय क्रिकेटमधील सर्वात कमी धावसंख्या
104 तिरुवनंतपुरम 2018
114 ब्रिजटाउन 2023*
121 पोर्ट ऑफ स्पेन 1997
123 कोलकाता 1993
126 पर्थ 1991
भारतीय संघाला 115 धावांचं आव्हान पूर्ण करताना जास्त संघर्ष करावा लागला नाही. पण भारतीय संघाने फलंदाजीत काही आश्चर्यकारक बदल केले. ईशान किशनला शुभमनसह पहिल्या क्रमांकावर पाठवण्यात आलं. सूर्यकुमार तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजीसाठी आला होता. विराट कोहली पाच विकेट्स पडल्यानंतरही फलंदाजीला आला नाही. तर रोहित शर्मा सातव्या क्रमांकावर फलंदाजीसाठी आला.