IND Vs WI: टीम इंडियावर ओझे झालेल्या या खेळाडूला कर्णधार रोहित दाखवणार बाहेरचा रस्ता!
India Vs West Indies : भारत (Team India) आणि वेस्ट इंडिज (West Indies) यांच्यातील तीन एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेतील पहिला सामना 6 फेब्रुवारी रोजी अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर होणार आहे.
मुंबई : India Vs West Indies : भारत (Team India) आणि वेस्ट इंडिज (West Indies) यांच्यातील तीन एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेतील पहिला सामना 6 फेब्रुवारी रोजी अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर होणार आहे. भारतीय संघ दक्षिण आफ्रिकेविरुद्धचा पराभव विसरुन नवी सुरुवात कराणार आहे. अशा स्थितीत भारतीय कर्णधार रोहित शर्मा हा कोणताही धोका पत्करणा नाही. वेस्ट इंडिजविरुद्धच्या पहिल्या सामन्यात रोहित शर्मा एका खेळाडूला बाहेरचा रस्ता दाखवू शकतो. हा खेळाडू मधल्या फळीतील संघाची सर्वात मोठी कमजोरी ठरला आहे.
या खेळाडूला टीममधून बाहेरचा रस्ता
वेस्ट इंडिजविरुद्ध रोहित शर्मा टीम इंडियावर ओझे बनलेल्या श्रेयस अय्यर याला बाहेरचा रस्ता दाखवू शकतो. अय्यर अत्यंत खराब फॉर्ममधून जात आहे. त्याच्या बॅटमधून धावा निघत नाहीत. श्रेयस अय्यर क्रीझवर टिकू शकत नाही. अशा स्थितीत टीम इंडियातून त्याचा पत्ता कट होऊ शकतो. निवडकर्त्यांनी अय्यरला खूप संधी दिल्या आहेत. त्याच्यामुळे अनेक युवा खेळाडूंना संघात स्थान मिळत नाही. अशा स्थितीत वेस्ट इंडिजविरुद्ध रोहित शर्मा श्रेयस अय्यर याच्या जागी सूर्यकुमार यादव किंवा दीपक हुडा यांना संधी देऊ शकतो.
दक्षिण आफ्रिकेविरुद्ध का झाला पराभव?
दक्षिण आफ्रिका दौऱ्यात टीम इंडियाची मधली फळी चांगली खेळली नाही. याचे सर्वात मोठे कारण होते श्रेयस अय्यर. विराट कोहली आणि शिखर धवन यांनी अनेकवेळा संघाला चांगली सुरुवात करून दिली, पण मधल्या फळीच्या असमर्थतेमुळे भारताला क्लीन स्वीपला सामोरे जावे लागले. अय्यरला तिन्ही सामने खेळण्याची संधी मिळाली, मात्र त्याने संधीचे सोने केले नाही. आफ्रिकन दौऱ्यावर त्याला एकही अर्धशतक झळकावता आले नाही. अशा परिस्थितीत त्याला वेस्ट इंडिजविरुद्धच्या पहिल्या एकदिवसीय सामन्यात खेळणे कठीण जात आहे, त्यामुळे त्याच्या कारकिर्दीवर पॉवर ब्रेक दिसत आहेत.
मधली फळी ही भारताची कमजोरी
एकेकाळी भारतीय संघाची मधली फळी खूपच मजबूत होती. जेव्हा महेंद्रसिंह धोनी, सुरेश रैना आणि युवराज सिंग यांच्यासारखे फलंदाज खेळत असत, पण तेव्हा विरोधी संघ त्यांना घाबरत असे. पण आता चित्र पूर्णपणे बदललेली दिसते. श्रेयस अय्यर आणि ऋषभ पंत हे कमाल दाखवू शकले नाहीत. टॉप ऑर्डर बाद होताच भारतीय मधली फळी कोलमडत आहे, ज्यामुळे नंतरच्या फलंदाजांवर दबाव वाढतो. अशा स्थितीत वेस्ट इंडिजविरुद्धच्या पहिल्या एकदिवसीय सामन्यात रोहित शर्माला अशा तगड्या फलंदाजाला मैदानात उतरवायचे आहे, जेणेकरून मधल्या फळीची समस्या संपेल.
रोहित शर्मा परतला
वेस्ट इंडिज मालिकेसाठी संघाचा नियमित कर्णधार रोहित शर्मा याचे पुनरागमन झाले आहे. दुखापतीमुळे तो दक्षिण आफ्रिका दौऱ्यावर जाऊ शकला नाही. त्याचबरोबर आयपीएल आणि देशांतर्गत क्रिकेटमध्ये चमकदार कामगिरी करणाऱ्या अनेक युवा खेळाडूंना संघात स्थान मिळाले आहे. अशा परिस्थितीत भारतीय संघ वेस्ट इंडिजविरुद्ध चमत्कार करु शकतो.