Ind vs WI: व्हाईट वॉश देण्यासाठी Shikhar Dhawan टीममध्ये करणार मोठे बदल, अशी असेल Playing XI
तिसऱ्या वनडेत टीम इंडियावर कोणतंही दडपण नसेल. अशा परिस्थितीत टीम इंडिया प्लेइंग इलेव्हनमध्ये मोठं बदल करून प्रयोग करण्याची शक्यता आहे.
मुंबई : भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यातील 3 वनडे सामन्यांच्या मालिकेतील तिसरा सामना 27 जुलै रोजी पोर्ट ऑफ स्पेनमध्ये संध्याकाळी 7 वाजता खेळला जाणार. ही वनडे सिरीज जिंकून टीम इंडिया आधीच 2-0 ने आघाडीवर आहे. या सिरीजमध्ये भारताने वेस्ट इंडिजविरुद्ध एकदिवसीय प्रकारात सलग 12वी मालिका जिंकून नवा विश्वविक्रम रचलाय.
तिसऱ्या वनडेत टीम इंडियावर कोणतंही दडपण नसेल. अशा परिस्थितीत टीम इंडिया प्लेइंग इलेव्हनमध्ये मोठं बदल करून प्रयोग करण्याची शक्यता आहे. वेस्ट इंडिजविरुद्धच्या तिसऱ्या वनडेमध्ये टीम इंडियाची प्लेइंग इलेव्हन कशी असेल यावर एक नजर टाकूया.
ओपनिंग जोडी
शिखर धवन आणि शुभमन गिल ही जोडी वेस्ट इंडिज दौऱ्यावर टीम इंडियासाठी वनडे फॉरमॅटमध्ये हिट ठरलीये. पहिल्या एकदिवसीय सामन्यात धवनने 97 रन्सचं सर्वोत्तम अर्धशतक झळकावलं. त्याचवेळी गिलने पहिल्या एकदिवसीय सामन्यात 64 धावा आणि दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात 43 धावा केल्या. त्यामुळे तिसऱ्या वनडेतही हीच जोडी पहायला मिळेल.
मिडल ऑर्डर
मिडल ऑर्डरची जबाबदारी जबरदस्त फॉर्मात असलेल्या श्रेयस अय्यरसह सूर्यकुमार यादव, संजू सॅमसन आणि दीपक हुडा यांच्यावर असेल. कोहलीच्या अनुपस्थितीत अय्यरने तिसर्या क्रमांकाची कमतरता भरून काढली आहे. याशिवाय सुर्यकुमार यादवचाही खेळ चांगला होत असून तिसऱ्या सामन्यात त्याला जागा मिळू शकते.
गोलंदाजीमध्ये होऊ शकतात बदल
दुसऱ्या वनडे सामन्यात प्रसिद्ध कृष्णाच्या जागी आयपीएल स्टार आवेश खानला टीममध्ये संधी देण्यात आली होती. मात्र, आवेशला या सामन्यात चांगला खेळ करता आला नाही. अशा स्थितीत अर्शदीप सिंगला तिसऱ्या वनडेत पदार्पणाची संधी मिळू शकते.
दुसरीकडे टीममध्ये दुसरा वेगवान गोलंदाज म्हणून मोहम्मद सिराजचं टीममध्ये नक्की खेळू शकतो. याशिवाय टीम मॅनेजमेंट फिरकी गोलंदाज युझवेंद्र चहलच्या जागी युवा फिरकीपटू रवी बिश्नोईला संधी देऊ शकतात.
अशी असू शकते प्लेइंग इलेव्हन
शुभमन गिल, शिखर धवन (कर्णधार), श्रेयस अय्यर, सूर्यकुमार यादव, संजू सॅमसन (विकेटकीपर), दीपक हुडा, अक्षर पटेल, शार्दुल ठाकूर, मोहम्मद सिराज, अर्शदीप सिंग आणि रवी बिश्नोई.