IND vs WI: पराभवनंतर टीम इंडियाला अजून एक मोठा धक्का; ICC कडून मोठा कारवाई
Team India Fined, 1st T20 : त्रिनिदादमध्ये झालेल्या सामन्यात टीम इंडियाचा ( Team India ) अवघ्या 4 रन्सने पराभव झाला. याचसोबत टीम इंडियाला मोठा धक्का देखील बसला आहे. यावेळी आयसीसीने ( ICC ) टीम इंडियावर मोठी कारवाई केली आहे.
Team India Fined, 1st T20 : टेस्ट आणि वनडे सिरीजनंतर टीम इंडिया ( Team India ) आता वेस्ट इंडिजविरूद्ध टी-20 सामने खेळतेय. यावेळी त्रिनिदादमध्ये झालेल्या सामन्यात टीम इंडियाचा ( Team India ) अवघ्या 4 रन्सने पराभव झाला. हार्दिक पंड्याच्या ( Hardik Pandya ) नेतृत्वाखाली टीम इंडियाला पराभवाची चव चाखावी लागली. दरम्यान याचसोबत टीम इंडियाला मोठा धक्का देखील बसला आहे. यावेळी आयसीसीने ( ICC ) टीम इंडियावर मोठी कारवाई केली आहे.
पहिल्या सामन्यात टीम इंडियाचा पराभव
त्रिनिदादच्या ब्रायन लारा स्टेडियमवर खेळल्या गेलेल्या या सामन्यात टीम इंडियाला 150 रन्सचं लक्ष्य देण्यात आलं होतं. मात्र टीम इंडियाच्या ( Team India ) फलंदाजांना हे सोप्पं लक्ष्य पार करण्यासाठी नाकीनऊ आले. वेस्ट इंडिजने प्रथम फलंदाजी करताना 6 विकेट्सवर 149 रन्स केले. यानंतर टीम इंडिया 9 विकेट्स गमावत अवघे 145 रन्स करू शकली. पराभवाचं दुःख असताना टीम इंडियावर आयसीसीने कारवाई देखील केली आहे.
आयसीसीने ठोठावला दंड
दरम्यान पहिल्या टी-20 सामन्यात टीम इंडिया आणि वेस्ट इंडिज यांना आयसीसीकडून दंड ठोठावण्यात आला आहे. या दोन्ही टीम्सना स्लो ओव्हर रेटसाठी दंड ठोठावण्यात आला आहे. या सामन्यात किमान षटकाच्या दरापेक्षा एक ओव्हर कमी असल्याने भारताला मॅच फीच्या पाच टक्के दंड ठोठावण्यात आला. तर वेस्ट इंडिजला किमान ओव्हरच्या दरापेक्षा दोन ओव्हर कमी राहिल्याबद्दल त्यांच्या मॅच फीच्या 10 टक्के दंड ठोठावण्यात आला.
ICC एलिट पॅनलचे सामनाधिकारी रिची रिचर्डसन यांनी हार्दिक पांड्या आणि रोवमन पॉवेल या कर्णधारांना अनुक्रमे एक आणि दोन ओव्हर्स निर्धारित वेळ कमी केल्याबद्दल शिक्षा देण्यात आलीये. ICC आचारसंहितेच्या अनुच्छेद 2.22 नुसार दिलेल्या वेळेत गोलंदाजी करण्यात अयशस्वी ठरलेल्या प्रत्येक ओव्हरसाठी त्यांच्या सामना शुल्काच्या 5 टक्के दंड आकारण्यात आला.
यासंदर्भात आयसीसीने एक निवेदन जाहीर केलं आहे. या निवेदनानुसार, हार्दिक पांड्या आणि रोवमन पॉवेल यांनी त्यांचा गुन्हा आणि प्रस्तावित निर्बंध स्वीकारले आहेत. मैदानावरील अंपायर ग्रेगरी ब्रॅथवेट आणि पॅट्रिक गुस्टार्ड, तिसरे पंच निगेल डुगुइड आणि चौथे पंच लेस्ली रेफर यांनी हे आरोप लावले. त्यामुळे आता टीम इंडियाला पराभवानंतर कारवाईलाही सामोरं जावं लागणार आहे.