Virat Kohli Viral Video: भारत आणि वेस्ट इंडिजमधील दोन कसोटी सामन्यांच्या मालिकेतील पहिला कसोटी सामना डोमिनिकामध्ये (Dominica) खेळला जात आहे. पहिल्या डावात वेस्ट इंडिज संघ फक्त 150 धावा करु शकला. दरम्यान, भारताने फलंदाजी करताना 2 विकेट गमावत 312 धावा केल्या आहेत. मैदानावर सध्या विराट कोहली (Virat Kohli) आणि यशस्वी जैसवाल (Yashasvi Jaiswal) खेळत आहेत. यशस्वी जैसवाल 143 धावांवर नाबाद आहे, तर विराट कोहली 36 धावांसह मैदानात आहे. दोघांनी 72 धावांची भागीदारी केली आहे. तिसऱ्या दिवशी भारतीय फलंदाज मोठी धावसंख्या उभारण्याची शक्यता आहे. यादरम्यान, सोशल मीडियावर (Social Media) एक व्हिडीओ व्हायरल (Viral Video) झाला आहे. 


सोशल मीडियावर व्हिडीओ व्हायरल


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

सोशल मीडियावर विराट कोहलीचा एक व्हिडीओ व्हायरल झाला आहे. या व्हिडीओत विराट कोहली चौकार लगावल्यानंतर सेलिब्रेशन करताना दिसत आहे. महत्त्वाचं म्हणजे यावेळी विराटचं ना शतक पूर्ण झालं होतं, ना अर्धशतक....तरीही तो सेलिब्रेशन करत असल्याने एकच चर्चा रंगली होती. 



कोहलीने सेलिब्रेशन का केलं?


रोहित शर्मा बाद झाल्यानंतर पहिल्यांदाच तिसऱ्या क्रमांकावर खेळण्यासाठी आलेला शुभमन गिल अपयशी ठरला.  शुभमन गिल फक्त 6 धावा करु शकला. शभुमन बाद झाल्यानंतर विराट कोहली खेळण्यासाठी आला. यावेळी त्याने फार संयम दाखवला. त्याने तब्बल 81 व्या चेंडूवर पहिला चौकार लगावला. यामुळे वॅरिकनच्या चेंडूवर कव्हर ड्राइव्हला चौकार लगावल्यानंतर त्याने ड्रेसिंग रुमकडे बॅट दाखवत सेलिब्रेशन करण्यास सुरुवात केली. 


पहिल्या डावात भारतीय संघाचा दबदबा


कसोटी सामन्यातील दुसऱा दिवस भारतीय संघाच्या नावे राहिला. भारताकडून रोहित शर्मा आणि यशस्वी जैसवालने शतकं ठोकली. रोहित शर्मा 221 चेंडूवर 103 धावा करत तंबूत परतला. त्याने आपल्या खेळीत 10 चौकार आणि 2 षटकार लगावले. दर शुभमन गिल फक्त 6 धावा करु शकला. वेस्ट इंडिजच्या जोमेल वरिक्कन आणि एलिक एंथान्जे यांना 1-1 विकेट मिळाली. यशस्वी जैसवाल आणि विराट कोहलीने तिसऱ्या विकेटसाठी 205 चेंडूत 72 धावांची भागीदारी केली. 


यशस्वी भावूक


"मला वाटतं ही माझ्यासाठी फार भावनिक खेळी होती. भारतीय संघात स्थान मिळणं फार कठीण असतं. मला माझे चाहते, संघ व्यवस्थापन आणि रोहित भाईचे आभार मानायचे आहेत," असं यशस्वी जैस्वालने म्हटलं आहे.


"ही खेळपट्टी धिमी असून, कठीण आणि आव्हानात्मक स्थिती होती. प्रचंड ऊन असून मला माझ्या देशासाठी काहीतरी करण्याची इच्छा होती. प्रत्येक चेंडू खेळत मला आनंद लुटायचा होता. मला कसोटी क्रिकेट आणि ते आव्हान आवडतं. जेव्हा बॉल स्विंग होतो तेव्हा मला फार आवडतं," असं यशस्वीने सांगितलं.


"आम्ही फार परिश्रम घेतले आहेत. मी मैदानात जाऊन व्यक्त झालो. शतक झाल्यानंतर माझ्यासाठी तो भावनिक क्षण होता. मला माझा फार अभिमान वाटत आहे. मी सर्वांचा आभारी आहे. ही फक्त सुरुवात असून, पुढेही चांगलं खेळण्याची इच्छा आहे," असं यशस्वी म्हणाला आहे.