मुंबई : चॅम्पियन्स ट्रॉफीच्या फायनलनंतर भारत आणि पाकिस्तानची टीम पुन्हा एकदा आमने-सामने असणार आहे. २ जुलैला भारत आणि पाकिस्तानच्या महिला टीममध्ये ही मॅच होणार आहे. इंग्लंडमध्ये सध्या महिलांचा क्रिकेट वर्ल्ड कप सुरु आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

२ जुलै म्हणजेच रविवारी दुपारी तीन वाजता डर्बीच्या काऊंटी ग्राऊंडवर ही मॅच होणार आहे. चॅम्पियन्स ट्रॉफीच्या फायनलमध्ये झालेल्या पराभवाचा बदला घेण्यासाठी भारतीय टीम मैदानात उतरेल.


भारतीय महिला टीम आणि पाकिस्तानी महिला टीम यांच्यामध्ये २००५ ते २०१७ पर्यंत ९ मॅच झाल्या आहेत. या ९ मॅचमध्ये पाकिस्तानला एकही मॅच जिंकता आली नाही. यामुळे मिताली राजची टीम मैदानात आत्मविश्वास घेऊन उतरेल.