India Playing 11 : बर्थ डे बॉय ऋषभ पंतवर मोठी जबाबदारी? अशी असेल भारताची प्लेइंग 11
भारत आणि दक्षिण आफ्रिकेदरम्यान आज तिसरा आणि शेवटचा टी20 सामना
India Playing 11 vs South Africa Match: भारत आणि दक्षिण आफ्रिकादरम्यानचा टी20 मालिकेतील (T20 Series) तिसरा आणि शेवटचा सामना आज इंदौरच्या (indore) होळकर स्टेडिअमवर (holkar cricket stadium) खेळवला जाणार आहे. भारतीय वेळेनुसार संध्याकाळी 7 वाजता सामन्याला सुरुवात होईल. पहिले दोनही सामने जिंकत भारताने याआधीच सीरिजवर कब्जा केला आहे. आता इंदौरमधला सामना जिंकून दक्षिण आफ्रिकेला क्लिन स्वीप देण्याचा रोहितसेनेचा प्रयत्न असेल.
कोहली आणि राहुलच्या जागी कोण?
भारताचा स्टार फलंदाज विराट कोहली (Viral Kohli) आणि केएल राहुल (KL Rahul) या दोघांना तिसऱ्या सामन्यासाठी विश्रांती देण्यात आली आहे. त्यामुळे अंतिम अकरा खेळाडूंमध्ये मुंबईकर श्रेयस अय्यर (Shreyas Iyer) आणि अष्टपैलू शाहबाज अहमदला (shahbaz ahmed) संधी मिळू शकते. या दोघांकडे स्वत:ला सिद्ध करण्याची पुन्हा एक संधी मिळणार आहे.
ऋषभ पंतला मिळणार बर्थ डे गिफ्ट
टीम इंडियाचा विकेटकिपर आणि फलंदाज ऋषभ पंतचा आज वाढदिवस आहे. अशात टीम मॅनेजमेंट ऋषभला गिफ्ट देण्याची शक्यता आहे. केएल राहुलच्या अनुपस्थितीत ऋषभ पंतला सलामीला संधी मिळण्याची शक्यता आहे. याआधीही ऋषभ पंतने डावाची सुरुवात केली आहे. गेल्या काही सामन्यांपासून ऋषभ फॉर्ममध्ये नाहीए. अशात सलामीला येत चांगली धावसंख्या उभारण्याची त्याला संधी आहे.
भारताची प्लेईंग 11
रोहित शर्मा (कर्णधार), ऋषभ पंत, श्रेयस अय्यर, सूर्यकुमार यादव, दिनेश कार्तिक (विकेटकीपर), अक्षर पटेल, शाहबाज अहमद, दीपक चाहर, रविचंद्रन अश्विन, हर्षल पटेल आणि अर्शदीप सिंह.
दक्षिण अफ्रीकेची प्लेईंग 11
क्विटंन डिकॉक (विकेटकीपर), टेम्बा बावुमा (कर्णधार), रिली रोसो/रीजा हेंड्रिक्स, एडेन मार्करम, डेविड मिलर, ट्रिस्टन स्टब्स, वायने पर्नेल, केशव महाराज, कगिसो रबाडा, एनरिक नॉर्किया आणि लुंगी एनगिडी.