एडलेट : एडलेट कसोटीत भारताने ऑस्ट्रेलियावर 31 रन्सनी मात करत कसोटी मालिकेत 1-0 अशी आघाडी घेतली आहे. ऑस्ट्रेलियाच्या भूमित पहिल्या मॅचमध्ये त्यांना पराभूत करण्याचा इतिहास भारताने केलाय. 71 वर्षांनी हा रेकॉर्ड भारतीय संघा ने केलाय. भारताच्या विजयात गोलंदाजाचा महत्त्वाचा वाटा होता. अपेक्षेप्रमाणे आर. आश्विनने चांगली कामगिरी गेली. पहिल्या डावात चेतेश्वर पुजाराच शतक महत्त्वपूर्ण ठरलं. पहिल्या डावात झालेली चूक भारताने दुसऱ्या डावात टाळली.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

 दोन्ही देशांमध्ये पहिली टेस्ट सिरीज 1947-48 ला खेळली गेली होती. या सिरीजमध्ये ऑस्ट्रेलियाचे कॅप्टन सर डॉन ब्रॅडमन तर भारताचे कॅप्टन लाला अमरनाथ होते. ही सिरीज ऑस्ट्रेलियाने 4-0 अशी जिंकली. यानंतर दोन्ही देशांमध्ये ऑस्ट्रेलियात खेळल्या गेलेल्या टेस्टमध्ये पहिला सामना भारत कधी जिंकला नव्हता. ऑस्ट्रेलियाला त्यांच्या भूमीत हरविण्याची ही पहिलीच वेळ आहे. 


पहिल्या सेशनमध्ये 82 रन्स, 2 विकेट 


भारतीय संघाने ऑस्ट्रेलियासमोर 323 रन्सच लक्ष्य ठेवल होतं. याच उत्तर देताना चौथ्या दिवशी (रविवारी) ऑस्ट्रेलियन संघान 4 विकेटच्या बदल्यात 194 रन्स बनवले होते. आज पाचव्या दिवशी ऑस्ट्रेलियाला जिंकण्यासाठी 57.1 ओव्हरमध्ये 137 रन्सची गरज होती. 


लंच ब्रेक पर्यंत ऑस्ट्रेलियाने पाचव्या दिवसाच्या पहिल्या सत्रात 82 रन्स बनविेले तर 2 विकेट गमावले. भारताने 80 ओव्हरचा खेळ झाल्यावर नवा बॉल घेतला. ईशांत शर्माने नव्या ओव्हरचा पहिली ओव्हर टाकली.