गोल्ड कोस्ट (ऑस्ट्रेलिया) : भारतीय पुरुष टेबल टेनिस टीमनं २१ व्या कॉमनवेल्थत गेम्सच्या पाचव्या दिवशी नायजेरियन टीमला हरवून आणखीन एक सुवर्ण पदक भारताच्या नावावर केलंय. ओक्सेनफोर्ड स्टुडिओजमध्ये खेळण्यात आलेल्या फायनलमध्ये भारतानं नायजेरियाला ३-० अशी मात दिली.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

फायनलची पहिली मॅच एकेरी होती. इथं अनुभवी खेळाडू अचंता शरथ कमल हिनं पहिला डाव ४-११ असा हरल्यानंतर पुन्हा जोरदार वापसी करत बोडे अमियोडूनला पुढच्या तीन डावांत ११-५, ११-४ आणि ११-९ अशी मात देऊन १-०नं भारताला पुढे आणलं.


दुसऱ्या एकेरी सामन्यात भारताच्या साथियान गणासेकरनलाही पहिल्या डावात १०-१२ नं पराभवाचा सामना करावा लागला. परंतु, त्यानंही मॅचमध्ये शानदार वापसी करत पुढच्या तीन गेम्समध्ये ११-३, ११-३, ११-४ नं जिंकून भारताल दुसरा आनंदाचा क्षण अनुभवण्याची संधी दिली. 


यानंतर तिसरी मॅच दुहेरी होती. या मॅचमध्ये हरमीत देसाई आणि साथियान गमासेकरननं नायजेरियाच्या ओलाजीडे ओमोटायो आणि बोडे अमियोडून यांच्या जोडीला ११-८, ११-५, ११-३ अशा फरकानं पछाडलं. 


२१ व्या राष्ट्रकुल स्पर्धेत भारताचं हे नववं सुवर्ण पदक आहे. तर, पाचव्या दिवसातलं भारताचं हे सहावं पदक आहे.  दिवसातलं पहिलं गोल्ड जीतू रायनं निशानेबाजीत पटकावलं.