तिरुअनंतपुरम : पावसामुळे भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील तिसरा सामन्याचा टॉसही अद्याप झालेला नाहीये. सामन्याच्या आधी पाऊस झाला होता. त्यामुळे आता मैदान सुकवण्याचे काम सुरु आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

हवामान विभागाने याआधीच सामन्यात पावसाची शक्यता व्यक्त केली होती. तीन सामन्यांच्या मालिकेतील हा अखेरचा सामना आहे. या सामन्यात डकवर्थ लुईस नियमाचा वापर केला जाण्याची दाट शक्यता आहे.


विराटलाही त्याप्रमाणे आपली योजना बनवावी लागेल. यादरम्यान हजारो रुपये खर्च करुन आलेल्या स्टेडियममधील प्रेक्षकांना टीम इंडियाने नाराज केले नाही. मैदानावर क्रिकेट संघाने फुटबॉल खेळण्यास सुरुवात केली.