कोलंबो : श्रीलंकेविरुद्धच्या दुसऱ्या कसोटी सामन्यात भारताने ९ बादर ६२२ धावांवर पहिला ड़ाव घोषित केलाय.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

दुसऱ्या दिवशी फलंदाजीमध्ये रवींद्र जडेजा, आर. अश्विन, वृद्धिमन साहा चमकले. रवींद्र जडेजा ७० धावांवर नाबाद राहिला. अश्विनने ५४ धावा केल्या. तर वृद्धिमन साहाने ६७ धावा केल्या.


पहिल्या दिवशी चेतेश्वर पुजारा आणि अजिंक्य रहाणेने प्रत्येकी शतकी खेळी करताना संघाला दिवसअखेर सव्वातीनशेपार मजल मारून दिली होती. त्यानंतर आज दिवसभरात अडीचशेहून अधिक धावांची भर घातली. आजच्या दिवसाच्या सुरुवातीला चेतेश्वर पुजारा झटपट बाद झाला. त्याने १३३ धावा केल्या. तर रहाणेला १३२ धावा करता आल्या.


श्रीलंकेकडून रंगना हेरथने सर्वाधिक चार बळी मिळवले. तर पुष्पकवर्माने २ बळी मिळवले.