India defeat by Australia : भारत आणि ऑस्ट्रेलियामधील तिसऱ्या टी-20 सामन्यात भारताच्या महिला संघाचा पराभव झाला आहे. ऑस्ट्रेलिया संघाच्या 173 धावांचा पाठलाग करताना भारतीय संघ 151 धावा करू शकला. पाच सामन्यांच्या मालिकेत ऑस्ट्रेलिया संघाने 2-1 ने आघाडी घेतली आहे. ऑस्ट्रेलियाच्या अष्टपैलू एलिस पेरीला 'सामनावीर' म्हणून गौरवण्यात आलं. पेरीने सर्वाधिक 75 धावा केल्या. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मालिकेतील दुसरा सामना टाई झाला होता, त्यानंतर झालेल्या सुपर ओव्हरमध्ये भारताने रोमहर्षक विजय मिळवला होता. आजच्या सामन्यामध्ये, ऑस्ट्रेलियाची सुरूवात खराब झाली होती, रेणूका सिंहने पहिला धक्का अवघ्या 2 धावांवर असताना दिला होता. त्यानंतर लगेच संघाच्या 5 धावा झाल्या असताना दुसरी विकेट गेली होती. त्यानंतर पेरीने 75 धावा आणि ग्रेस हॅरिसने अवघ्या 18 चेंडूत केलेली 41 धावांची आक्रमक खेळी. 20 षटकांखेर ऑस्ट्रेलियाने भारताला 173 धावांचं आव्हान दिलं होतं. 


आव्हानाचा पाठलाग करण्यासाठी उतरल्यावर भारताची सलामीवीर स्मृती मानधना लवकर बाद झाली. भारताकडून शेफाली वर्माने 52 धावांची अर्धशतकी खेळी केली.  हरमप्रीत कौर 37 धावा आणि दीप्ती शर्मा नाबाद 25 धावा यांनना वगळता इतर कोणत्याही फलंदाजांना तग धरता आलं नाही. ऑस्ट्रेलियाच्या गोलंदाजांनी दमदार कामगिरी करत भारताच्या महिला संघाला 151 धावांमध्ये रोखलं. चौथ्या सामना भारतासाठी करो या मरो असणार आहे.