लंडन : आयर्लंडविरुद्धच्या सोप्या परीक्षेनंतर आता भारतीय टीमला इंग्लंडचा कठीण पेपर द्यावा लागणार आहे. इंग्लंड दौऱ्यामध्ये भारत ३ टी-२०, ३ वनडे आणि ५ टेस्ट मॅचची सीरिज खेळणार आहे. ३ जुलैपासून टी-२० सीरिजला सुरुवात होणार आहे. 


विराटचा फॉर्म चिंतेचा विषय 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

इंग्लंडविरुद्धच्या सीरिजआधी भारताचं टेन्शन वाढलं आहे. कारण भारताचा कर्णधार आणि भरवशाच्या विराट कोहलीची बॅट अजूनही तळपलेली नाही.  आयर्लंडविरुद्धच्या दोन टी-२० मॅचची सीरिज ही इंग्लंड दौऱ्याआधी सराव मानली जात होती. पण या सीरिजमध्ये विराट कोहलीनं फक्त ९ रन केले. यातल्या पहिल्या टी-२० मध्ये तर विराट शून्य रनवर आऊट झाला. पीटर चेजनं विराटला माघारी पाठवलं. दुसऱ्या टी-२० मध्ये विराट ओपनिंगला आला होता. पण या मॅचमध्ये विराटला ९ रन करता आले. मागच्या ५ टी-२० इनिंगमध्ये विराट अयशस्वी होत आहे. १३, २६,, १, ० आणि ९ हे विराटचे स्कोअर आहेत. मागच्या ५ इनिंगमुळे विराटची टी-२० मधली सरासरी ५० पेक्षा कमी आली आहे. विराट कोहलीची सरासरी ५२.१५ वरून ४८.५८ वर आली आहे. 


विराटचं इंग्लंडमधील अपयश


२०१४ सालच्या इंग्लंड दौऱ्यामध्ये विराट कोहली अयशस्वी ठरला होता. ५ टेस्ट मॅचच्या सीरिजमध्ये विराटला एकही अर्धशतक बनवता आलं नव्हतं. ५ टेस्ट मॅचमध्ये विराटनं १, ८, २५, ०, ३९, २८, ०, ७, ६ आणि २० रन केल्या. या रन विराटनं १३.५० च्या सरासरीनं रन केले होते. तर वनडेमध्ये विराटनं ०, ४०, १ नाबाद आणि १३ रन केल्या होत्या. 


टी-२० सीरिजचं वेळापत्रक


३ जुलै- पहिली टी-२०


६ जुलै- दुसरी टी-२०


८ जुलै- तिसरी टी-२०


वनडे सीरिजचं वेळापत्रक


१२ जुलै- पहिली वनडे


१४ जुलै- दुसरी वनडे 


१७ जुलै- तिसरी वनडे


टेस्ट सीरिजचं वेळापत्रक 


१ ऑगस्ट ते ५ ऑगस्ट- पहिली टेस्ट


९ ऑगस्ट ते १३ ऑगस्ट- दुसरी टेस्ट 


१८ ऑगस्ट ते २२ ऑगस्ट- तिसरी टेस्ट 


३० ऑगस्ट ते ३ सप्टेंबर- चौथी टेस्ट 


७ सप्टेंबर ते ११ सप्टेंबर- पाचवी टेस्ट