हेमिल्टन​ : भारत विरुद्ध न्यूझीलंड पहिल्या वनडे सामन्यात भारताने न्यूझीलंडसमोर 348 रनचं टार्गेट ठेवलं आहे. भारताकडून श्रेयस अय्यरने सर्वाधिक 103 रनची खेळी केली. तर मंयक अग्रवालने 32, केएल राहुलने 88, विराट कोहलीने 51, पृथ्वी शॉने 20, केदार जाधवने 26 रनची खेळी केली. आधी टॉस जिंकत न्यूझीलंडने बॉलिंग करण्याचा निर्णय घेतला होता. भारतीय संघाने 4 विकेट गमवत पहिल्या वनडेमध्ये 50 ओव्हरमध्ये 347 रन केले. न्यूझीलंडकडून टीम साऊदीने 2, कोलीन ग्रँडहोमने 1 तर ईश सोढीने 1 विकेट घेतली.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

टीम इंडियाचा खेळाडू श्रेयस अय्यरने आपल्या वनडे करिअरमधील पहिलं शतक ठोकलं. अय्यरने 107 बॉलमध्ये त्याने १०३ रनची निर्णायक खेळी केली. तर विकेटकीपर केएल राहुलने पांचव्या स्थानी येत 64 बॉलमध्ये 88 रनची खेळी केली. राहुलने वनडे करिअरमधील ७ वं अर्धशतक पूर्ण केलं. तर कर्णधार विराट कोहलीने 51 रन केले.


पृथ्वी शॉ आणि मयंक अग्रवाल ही जोडी आज ओपनिंगला मैदानात उतरली. दोघांनी पहिल्या विकेटसाठी 50 रनची पार्टनरशिप केली. त्यानंतर विराट कोहली आणि श्रेयस अय्यरने 102 रनची पार्टनरशिप केली.


या वनडे सामन्यातून पृथ्वी शॉ आणि मयंक अग्रवाल यांनी डेब्यू केलं आहे. य़ाशिवाय कुलदीप यादव आणि केदार जाधव यांना देखील आज खेळण्याची संधी देण्य़ात आली आहे.


भारतीय टीम : पृथ्वी शॉ, मयंक अग्रवाल, विराट कोहली (कर्णधार), श्रेयस अय्यर, केएल राहुल (विकेटकीपर), केदार जाधव, रवींद्र जडेजा, कुलदीप यादव, मोहम्मद शमी, जसप्रीत बुमराह, शार्दुल ठाकुर.


न्यूझीलंड टीम : मार्टिन गप्टिल, हेनरी निकोल्स, टॉम लाथम (कर्णधार, विकेटकीपर), टॉम ब्लंडेल, रॉस टेलर, जिमी नीशाम, कॉलिन डि ग्रँडहोम, मिशेल सेंटनर, हॅमिश बेनेट, ईश सोढ़ी, टिम साउदी.