मुंबई : विराट कोहलीच्या नेतृत्वात असलेल्या भारतीय संघाला ऑस्ट्रेलियाला तीनही स्वरुपात पराभूत करण्याची खूप चांगली संधी असल्याचं भारताचा माजी फलंदाज व्हीव्हीएस लक्ष्मण याने म्हटलं आहे. गेल्या वेळी जेव्हा भारतीय संघ ऑस्ट्रेलियाच्या दौऱ्यावर गेला होता तेव्हा त्याने 12 प्रयत्नांनंतर ऑस्ट्रेलियाच्या भूमीवर 71 वर्षानंतर पहिली कसोटी मालिका जिंकली होती.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

लक्ष्मण म्हणाला की, 'मला वाटते की तिन्ही फॉर्मेटमध्ये भारताला मालिका जिंकण्याची चांगली संधी आहे. ज्या प्रकारे दौर्‍याचे वेळापत्रक नियोजित आहे ते भारतासाठी चांगले आहे. या मालिकेवर आयपीएलचा कोणताही परिणाम होणार नाही.'


लक्ष्मण म्हणाले की, 'आयपीएल कोणत्याही आंतरराष्ट्रीय स्पर्धेपेक्षा वेगळा आहे. आपण पाहत असलेल्या स्पर्धेचा प्रकार आणि आपण ज्या खेळाडूसह किंवा विरुद्ध खेळता त्या खेळाची गुणवत्ता. त्यामुळे सर्व खेळाडू उत्तम लयमध्ये आहेत आणि मला खात्री आहे की ते त्यांच्यासाठी अनुकूल असतील. मला असे वाटते की त्याचा फायदा होईल. कामाचा ताण कदाचित एक समस्या असू शकेल, परंतु मला वाटते की त्याचा खेळाडूंवर परिणाम होऊ नये, कारण आयपीएलच्या अंतिम सामन्यात आणि 27 नोव्हेंबरला होणाऱ्या पहिल्या एकदिवसीय सामन्यादरम्यान 16 दिवसांचा अंतर आहे. मला खात्री आहे की, त्यांची तब्येत बरी झाली आहे आणि टीम मॅनेजमेंट आणि कोचिंग सपोर्ट स्टाफ अतिशय योग्य पद्धतीने योजना आखत आहेत जेणेकरुन वनडे सामन्यापूर्वी सर्व खेळाडूंना फ्रेश करतील.'


'53 दिवस आयपीएल खेळल्यानंतरही खेळाडू थकलेले नाहीत आणि त्यांना दौरा सुरू करताना काहीच हरकत नाही,' असा विश्वास या माजी फलंदाजाने व्यक्त केला आहे. ते म्हणाले की, सर्व खेळाडू प्रोफेशनल आहेत आणि त्यांनी आपल्या फिटनेसवर बरेच काम केले आहे. आयपीएल ही दोन महिन्यांची लांबलचक स्पर्धा होती, पण आता त्यांना या सामन्यांसाठी फिट होण्यासाठी पुरेसा वेळ मिळाला आहे. चांगली गोष्ट म्हणजे आयपीएल युएईमध्ये झाला आणि खेळाडूंना जास्त प्रवास करावा लागला नाही. म्हणून मला वाटत नाही की ते थकले असतील.'