IND vs NED : टॉस जिंकून रोहित शर्माने घेतला महत्त्वाचा निर्णय, पाहा कशी असेल Playing XI
India vs Netherlands : टीम इंडियाने टॉस जिंकला असून रोहित शर्माने प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे.
IND vs NED Playing XI : विश्वचषकाच्या रणांगणात भारताचा अखेरचा साखळी सामना आज नेदरलँड्सशी होतोय. हा सामना बंगळुरुच्या चिन्नास्वामी स्टेडियमवर खेळवण्यात येईल. भारतानं लागोपाठ आठ सामन्यांमध्ये विजय मिळवून विश्वचषकाच्या गुणतालिकेत अव्वल स्थान तर पटकावलंय. नेदरलँडने संघानं दक्षिण आफ्रिका आणि बांगलादेशसारख्या बलाढ्य संघांना हरवलंय. त्यामुळं नेदरलँडला हलक्या घेऊन जमणार नाही. नेदरलँड वर्ल्ड कपमधून बाहेर पडला खरा पण चॅम्पियन ट्रॉफीच्या आशा जिवंत होत्या. मात्र, इंग्लंडने पाकिस्तानचा पराभव केल्याने नेदरलँडचा चॅम्पियन ट्रॉफीमधून सुपडा साफ झाला. त्यामुळे नेदरलँडसाठी हा प्रतिष्ठेचा सामना असेल. टीम इंडियाने टॉस जिंकला असून रोहित शर्माने प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे.
टॉस जिंकल्यावर काय म्हणाला रोहित शर्मा?
आम्ही टॉस जिंकल्यानंतर प्रथम फलंदाजी करणार आहोत. आमच्यासाठी वर्ल्ड कप चांगला राहिलाय. आजचं मैदान हे रनचेस करण्यासाठी चांगलं आहे. पण आम्ही सर्वोत्तम प्रयत्न करून सामना जिंकू, असा विश्वास रोहित शर्माने व्यक्त केलाय. त्याचबरोबर संघात कोणतेही बदल केले नाहीत, असंही रोहित शर्माने म्हटलं आहे.
राहुल द्रविड काय म्हणाले होते?
अखेरच्या मॅचनंतर आतापर्यंत ६ दिवसांचा ब्रेक मिळाला आहे. सर्व खेळाडू चांगल्या मानसिकतेत आहेत आणि मॅच खेळण्यास तयार आहेत. सेमीफायनलच्या मॅचच्या आधी फक्त एक लढत आहे आणि आम्ही पूर्ण तयारी केली आहे. वर्ल्डकप अखेरच्या टप्प्यात आहे आणि आमचा फोकस हा बेस्ट खेळाडू अंतिम ११ मध्ये ठेवण्याचा आहे. ही गोष्ट फक्त मानसिक नाही तर शारीरिक दृष्ट्या मदत करेल. ज्यामुळे सेमीफायनल आणि फायनलसाठी आम्हाला सर्वोत्तम कामगिरी करण्यास मदत करेल. आशा आहे की आम्ही फायनल खेळणार आहोत, असं राहुल द्रविड यांनी म्हटलं होतं.
भारत (प्लेइंग इलेव्हन): रोहित शर्मा (कॅप्टन), शुभमन गिल, विराट कोहली, श्रेयस अय्यर, केएल राहुल, सूर्यकुमार यादव, रवींद्र जडेजा, मोहम्मद शमी, जसप्रीत बुमराह, कुलदीप यादव, मोहम्मद सिराज.
नेदरलँड्स (प्लेइंग इलेव्हन): वेस्ली बॅरेसी, मॅक्स ओडोड, कॉलिन अकरमन, सायब्रँड एंजेलब्रेक्ट, स्कॉट एडवर्ड्स (कॅप्टन), बास डी लीडे, तेजा निदामनुरु, लोगान व्हॅन बीक, रोएलॉफ व्हॅन डर मर्वे, आर्यन दत्त, पॉल व्हॅन मीकरेन.