IND vs WI 5th T20: निर्णायक सामन्यात भारताने जिंकला टॉस; पाहा दोन्ही संघाची Playing XI
India vs West Indies 5th T20: भारत आणि वेस्ट इंडिजमध्ये शेवटचा टी 20 सामना खेळवला जात आहे. दोन्ही संघांसाठी ‘करो या मरो’ असा असेल. या सामन्यात भारताने टॉस जिंकला आहे.
IND vs WI 5th T20I: भारत आणि वेस्ट इंडिज (India vs West Indies) यांच्यातील पाचवा टी-20 आंतरराष्ट्रीय सामना फ्लोरिडा येथील सेंट्रल ब्रॉवर्ड रिजनल पार्क स्टेडियम टर्फ मैदानावर होणार आहे. चौथाही सामना येथेच झाला होता. खेळपट्टी फलंदाजांना पोषक असल्यामुळे धावांचा पाऊस पडण्याची शक्यता वर्तविली जात आहे. वेस्ट इंडिजने सुरुवातीला सलग दोन्ही सामने जिंकले होते. त्यानंतर उर्वरित दोन सामन्यांत भारताने दमदार पुनरागमन करत मालिकेत बरोबरी साधली. अशातच आता शेवटचा सामना निर्णय असणार आहे. ( India have won the toss and have opted to bat )
निर्णायक सामन्यात भारताने टॉस जिंकला असून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. कॅप्टन हार्दिक पांड्याने संघात कोणताही बदल केला नसून पुन्हा इशान किशनला संघात संधी मिळाली नाही. यशस्वी जयस्वाल आणि शुभमन गिल यांच्यावर पुन्हा एकदा विश्वास दाखवण्यात आलाय. त्यामुळे आता महत्त्वाच्या सामन्यात टीम इंडियाचं प्रदर्शन कसं राहिल? याची औत्सुकता लागली आहे.
पाहा दोन्ही संघाची प्लेईंग इलेव्हन
वेस्ट इंडीज (प्लेइंग इलेव्हन): ब्रँडन किंग, काइल मेयर्स, शाई होप, निकोलस पूरन (डब्ल्यू), रोव्हमन पॉवेल (क), शिमरॉन हेटमायर, जेसन होल्डर, रोस्टन चेस, रोमॅरियो शेफर्ड, अकेल होसेन, अल्झारी जोसेफ.
भारत (प्लेइंग इलेव्हन): यशस्वी जैस्वाल, शुभमन गिल, सूर्यकुमार यादव, टिळक वर्मा, हार्दिक पंड्या (क), संजू सॅमसन (डब्ल्यू), अक्षर पटेल, कुलदीप यादव, अर्शदीप सिंग, युझवेंद्र चहल, मुकेश कुमार.