IND Vs BAN: पराभवानंतर कर्णधार रोहित शर्माची पहिली प्रतिक्रिया, `प्रामाणिकपणे सांगायचं तर...`
India Loss Series Against Bangladesh: कर्णधार रोहित शर्माची 28 चेंडूत नाबाद 51 धावांची खेळी व्यर्थ गेली. शेवटच्या चेंडूवर 6 धावा करण्यात रोहित शर्माला अपयश आलं. त्यामुळे भारताचा 5 धावांनी पराभव झाला. या पराभवानंतर कर्णधार रोहित शर्मानं प्रतिक्रिया नोंदवली आहे.
India Loss Series Against Bangladesh Rohit Sharma Reaction: बांगलादेश विरुद्धची मालिका भारतानं 2-0 ने गमावली आहे. सलग दोन विजयामुळे तीन सामन्यांची मालिका बांगलादेशनं खिशात घातली आहे. बांगलादेशनं नाणेफेक जिंकत प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय पथ्यावर पडला. बांगलादेशनं 50 षटकांच्या खेळात 7 गडी गमवून 271 धावा केल्या आणि विजयासाठी 272 धावांचं आव्हान दिलं. मात्र भारतीय संघ 9 गडी गमवून 266 धावा करु शकला. कर्णधार रोहित शर्माची 28 चेंडूत नाबाद 51 धावांची खेळी व्यर्थ गेली. शेवटच्या चेंडूवर 6 धावा करण्यात रोहित शर्माला अपयश आलं. त्यामुळे भारताचा 5 धावांनी पराभव झाला. या पराभवानंतर कर्णधार रोहित शर्मानं प्रतिक्रिया नोंदवली आहे.
"प्रामाणिकपणे सांगायचं तर, अंगठ्याला फ्रॅक्चर नसल्याने मी येऊन फलंदाजी करू शकलो. जेव्हा तुम्ही सामना गमवता, तेव्हा सकारात्मक आणि नकारात्मक दोन्ही गोष्टी असतात. 6 गडी बाद झाल्यानंतर 70 वरून 270 धावा करणं हे गोलंदाजांचं अपयश आहे.", असं कर्णधार रोहित शर्मा म्हणाला.
बांगलादेशच्या मेहिदी हसन मिराझनं भारतीय गोलंदाजांना अक्षरश: रडवलं. सलग दुसऱ्या सामन्यात विजयाचा मानकरी ठरला. पहिल्या सामन्यात नाबाद 38 धावांची विजयी खेळी केली होती. त्यानंतर दुसऱ्या सामन्यात नाबाद शतक झळकावून आंतरराष्ट्रीय स्तरावर आपली छाप पाडली आहे.
बांगलादेशचा संघ- अनामुल हक, लिट्टोन दास, नजमुल होसेन शांतो, शाकिब अल हसन, मुशफिकर रहिम, महमुदुल्ला, अफिफ होस्सेन, मेहिदी हसन, इबादत होस्सेन, नसुम अहमद, मुस्ताफिजुर रहमान
भारताचा संघ- रोहित शर्मा, शिखर धवन, विराट कोहली, श्रेयस अय्यर, केएल राहुल, वाशिंग्टन सुंदर, अक्षर पटेल, शार्दुल ठाकुर, दीपक चाहर, मोहम्मद सिराज, उमरान मलिक