IND vs SL 2nd T20 : भारत आणि श्रीलंकेमधील दुसरा सामनाही रोमहर्षक झालेला पाहायला मिळाला. श्रीलंकेच्या 207 धावांचा पाठलाग करताना टीम इंडियाला निर्धारित 20 षटकात 190 धावा करता आल्या. ऑल राऊंडर अक्षर पटेलने एकट्याने झुंज देत सामन्यात रंगत आणली होती मात्र शेवटच्या षटकात दसुन शनाकाने स्वत: गोलंदाजी करत अक्षरला 65 धावांवर बाद करत सामना श्रीलंकेच्या पारड्यात झुकवला. श्रीलंकेने हा सामना 16 धावांनी जिंकत मालिकेमध्ये 1-1 ने बरोबरी साधली आहे. (India lost the second T20 match against Sri Lanka latest marathi sports news)


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

श्रीलंकेच्या डोंगराएवढ्या आव्हानाचा पाठलाग करताना भारताची खराब सुरूवात झाली सलामीवीर इशान किशन 2 धावा, शुभमन गिल 5 धावा आणि पदार्पणवीर राहुल त्रिपाठी 5 धावा हे स्वस्तात परतले. कर्णधार हार्दिक पंड्या आणि सूर्यकुमार यादव यांच्याकडून मोठ्या खेळीची अपेक्षा होती. मात्र पांड्याही 12 धावा काढूत माघारी परतला. 
 
पंड्या बाद झाल्यानंतर फलंदाजीला आलेल्या अक्षर पटेलने धुंवाधार खेळी करत  सर्वांची मने जिंकलीत. सूर्या आणि अक्षर पटेल यांनी  92 धावांची भागीदारी केली. अर्धशतक केल्यानंतर सूर्या मोठा फटका खेळण्याच्या प्रयत्नात 51 धावांवर बाद झाला. सामना संपला असं वाटत असताना दुसरा सामना खेळणाऱ्या शिवम मावीने 15 चेंडूत 26 धावांची आक्रमक खेळी केली. 


शेवटच्या षटकात भारताला 22 धावांची गरज होती. मात्र शनाकाने स्वत: गोलंदाजी करत अवघ्या 4 धावा दिल्या आणि 2 विकेट्स घेतल्या. श्रीलंकेने या विजयासह टी-20 मालिकेमध्ये बरोबरी साधली आहे. तिसरा सामना दोन्ही संघांसाठी करो या मरो असा असणर आहे.