चांगल्या सुरुवातीनंतर भारताला धक्के
इंग्लंडविरुद्धच्या पहिल्या टेस्टमध्ये चांगली सुरुवात केल्यानंतर भारताला धक्के बसले आहेत.
बर्मिंगहॅम : इंग्लंडविरुद्धच्या पहिल्या टेस्टमध्ये चांगली सुरुवात केल्यानंतर भारताला धक्के बसले आहेत. दुसऱ्या दिवसाच्या सुरुवातीलाच इंग्लंडला २८७ रनवर ऑल आऊट केल्यानंतर भारतीय टीम बॅटिंगला आली. ओपनर मुरली विजय आणि शिखर धवननं भारताला ५० रनची ओपनिंग पार्टनरशीप करून दिली. पण यानंतर लगेचच मुरली विजय आऊट झाला. त्यानंतर बॅटिंगला आलेला लोकेश राहुलही एक फोर मारून पॅव्हेलियनमध्ये परतला. लोकेश राहुलनंतर शिखर धवनही आऊट झाला. इंग्लंडच्या सॅम कुरनला तिन्ही विकेट मिळाल्या. दुसऱ्या दिवशी लंचवेळी भारताचा स्कोअर ७६/३ एवढा झाला आहे. विराट कोहली ९ रनवर तर अजिंक्य रहाणे ८ रनवर खेळत आहे. भारताच्या तिन्ही विकेट फास्ट बॉलर सॅम कुरननं घेतल्या आहेत.
त्याआधी दुसऱ्या दिवसाची सुरुवात २८५/९ अशी करणाऱ्या इंग्लंडला दुसऱ्या दिवशी फक्त २ रनच करता आल्या. मोहम्मद शमीनं इंग्लंडची शेवटची विकेट घेतली. भारताकडून अश्विनला सर्वाधिक ४ विकेट मिळाल्या. तर मोहम्मद शमीला ३ विकेट घेण्यात यश आलं. उमेश यादव आणि इशांत शर्माला प्रत्येकी १-१ विकेट मिळाली. इंग्लंडचा कर्णधार जो रूटनं सर्वाधिक ८० रन केल्या. रूटला विराट कोहलीनं रन आऊट केलं. तर जॉनी बेअरस्टोला ७० रनवर उमेश यादवनं बोल्ड केलं.