इंदूर : भारताविरुद्धच्या तिसऱ्या वनडे सामन्य़ात ऑस्ट्रेलियाने विजयासाठी २९४ धावांचे आव्हान ठेवलेय. आरोन फिंचचे दमदार शतक, कर्णधार स्टीव्हन स्मिथच्य़ा अर्धशतकांच्या जोरावर ऑस्ट्रेलियाला ५० षटकांत सहा बाद २९३  धावा करता आल्या.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

सलामीवीर आरोन फिंचने १२५ चेंडूत १२ चौकार आणि ५ षटकारांसह १२४ धावा तडकावल्या. त्याला स्टीव्हन स्मिथने चांगली साथ दिली. स्मिथने ७१ चेंडूत ६३ धावा केल्या. 


डेविड वॉर्नरने ४२ धावा केल्या. तर ग्लेन मॅक्सवेल ५ तर ट्रॅव्हिस हेड ४ धावांवर बाद झाला. 


भारताकडून कुलदीप यादव आणि बुमराहने सर्वाधिक दोन विकेट घेतल्या तर चहल आणि पांड्या यांनी प्रत्येकी एक विकेट घेतली.