INDvsAUS: पहिल्या दिवस अखेर भारत ३०३/४
भारत आणि ऑस्ट्रेलिया सिरीजमधील शेवटचा सामना
सिडनी : चेतेश्वर पुजाराच्या १३० रनच्या खेळीच्या जोरावर भारताने ऑस्ट्रेलिया विरुद्ध चौथ्या आणि अंतिम सामन्यात ४ विकेट गमवत ३०३ रन रन केले आहेत. ऐतिहासिक सिडनी क्रिकेट ग्राउंड हा सामना होत आहे. पहिल्या दिवसाचा खेळ संपेपर्यंत पुजारा आणि हनुमा विहारी मैदानावर नाबाद आहेत. टॉस जिंकत आधी बॅटींगचा निर्णय घेणाऱ्या कर्णधार विराट कोहलीने २३ रन केले. या सामन्यात आपल्या करिअरचा दुसरा टेस्ट सामना खेळणाऱ्या मयंक अग्रवालने ७७ रन केले आहेत. केएल राहुलने पुन्हा एकदा नाराज केलं. तो फक्त ९ रनवर आऊट झाला. उपकर्णधार अजिंक्य रहाणे देखील १८ रनवर आऊट झाला.
पुजारा आणि मयंक यांच्यात दुसऱ्या विकेटसाठी ११६ रनची पार्टनरशिप झाली. मोठा शॉट मारण्याच्या प्रयत्नात मयंक मिशेल स्टॉर्कच्या हाती कॅच झाला. त्याने ११२ बॉल खेळत ७ फोर आणि २ सिक्स मारले. पुजाराने यानंतर विकाट कोहलीसोबत भारताला १७७ रनपर्यंत पोहोचवलं. हेजलवुडने कोहलीला माघारी पाठवलं. त्यानंतर स्टॉर्कने रहाणेला माघारी पाठवलं.
आस्ट्रेलियाविरुद्ध एका सीरीजमध्ये सर्वाधिक शतक ठोकणाऱ्यांच्या यादीत तो तिसऱ्या स्थानी पोहोचला आहे. या यादीत कोहली पहिल्या आणि सुनील गावस्कर दुसऱ्या स्थानी आहे. पुजाराने पाचव्या विकेटसाठी विहारी सोबत ७५ रन जोडले आणि टीमला ३०३ रनपर्यंत पोहोचवलं. पुजाराने २५० बॉलचा सामना करत १६ फोर मारले आहेत.
ऑस्ट्रेलियामध्ये सुरु असलेल्या बॉर्डर-गावस्कर ट्रॉफीचा आजपासून चौथा आणि शेवटचा सामना सुरु झाला आहे. ऐतिहासिक सिडनी क्रिकेट ग्राउंडमध्ये गहा सामना सुरु आहे. विराट कोहलीने टॉस जिंकत आधी बॅटींग करण्याचा निर्णय़ घेतला आहे. भारत आणि ऑस्ट्रेलिया दरम्यान चार टेस्ट मॅचच्या सीरिजच्या शेवटच्या टेस्ट मॅचचा आज पहिलाच दिवस आहे.
भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात सुरु असलेल्या चौथ्या आणि शेवटच्या टेस्ट सामन्यात चेतेश्वर पुजाराने आणखी एक जबरदस्त शतक ठोकलं आहे. भारतीय टीमने ४ विकेट गमवत २६० रन पूर्ण केले आहेत. चेतेश्वर पुजाराने पुन्हा एकदा शानदार शतक ठोकत भारताला चांगल्या स्थितीत नेऊन ठेवलं आहे. पुजाराचं हे या सिरीजमधलं तिसरं शतक आहे. सध्या मैदानात त्याच्या सोबत हनुमा बिहारी १३ रनवर बॅटींग करत आहे. या सामन्यात आपल्या करिअरचा दुसरा टेस्ट सामना खेळणाऱ्या मयंक अग्रवालने ७७ रन केले आहेत. केएल राहुलने पुन्हा एकदा नाराज केलं. तो फक्त ९ रनवर आऊट झाला. विराट कोहली २३ रनवर आऊट झाला. अजिंक्य रहाणे देखील १८ रनवर आऊट झाला.
कर्णधार विराट कोहलीने टॉस जिंकत आधी बॅटींग करण्याचा निर्णय घेतला. रोहित शर्मा या सामन्यात खेळत नाही आहे. त्याच्या जागी के एल राहुलला संधी देण्यात आली होती. उमेश यादवच्या जागी कुलदीप यादवला संघात स्थान मिळालं आहे. दुसरीकडे ऑस्ट्रेलियाने देखील संघात २ बदल केले आहेत. एरोन फिंच आणि मिशेल मार्शच्या जागी पीटर हँड्सकोम्ब आणि मार्नस लाबुचागनेला टीममध्ये घेतलं आहे.
टीम इंडियानं अशा गमावल्या विकेट
लोकेश राहुल १०-१ (१.३ ओव्हर) , मयंक अगरवाल १२६-२ (३३.६ ओव्हर), विराट कोहली १८०-३ (५२.५ ओव्हर)
पुजाराची हाफ सेन्चुरी
चहाच्या विश्रांतीपर्यंत टीम इंडियानं पहिल्याच दिवशी दोन विकेट गमावत १७७ रन्स केलेत. चहापर्यंत चेतेश्वर पुजारानं (६१) हाफ सेन्चुरी ठोकली तर विराट कोहली (२३) मैदानावर उभा राहिलाय.
दुसऱ्या सत्रात चेतेश्वर पुजारानं पुन्हा एकदा टीम इंडियासाठी दमदार खेळी करत शानदार हाफ सेन्चुरी ठोकली. पुजारानं या सीरिजमध्ये या अगोदरही दोन शतक ठोकलेत. यापूर्वी पर्थ टेस्टमध्ये पुजारानं सेन्चुरी ठोकली होती.
टीम इंडियाचा कॅप्टन विराट कोहलीनं टॉस जिंकून प्रथम बॅटिंग करण्याचा निर्णय घेतला. भारत चार मॅचच्या सीरिजमध्ये २-१ नं पुढे आहे... या मॅचमध्ये दुखापतीमुळे इशांत शर्मा आणि स्पिनर रविचंद्रन अश्विन यांना टीम इंडियामध्ये जागा मिळू शकलेली नाही.
अशा आहेत टीम्स
भारत : विराट कोहली (कॅप्टन), मयंक अगरवाल, हनुमा विहारी, लोकेश राहुल, चेतेश्वर पुजारा, अजिंक्य रहाणे, ऋषभ पंत, रविंद्र जडेजा, जसप्रीत बुमराह, मोहम्मद शम्मी
ऑस्ट्रेलिया : टिम पेन, मार्कस हॅरिस, उस्मान ख्वाजा, ट्रेविस हेड, शान मार्श, नाथन लायन, मिचेल स्टार्क, पैट कमिन्स, जोश हेजलवुड, मार्नस लाबसचग्ने, पीटर हॅड्सकॉम्ब.