लंडन : इंग्लंडविरुद्धच्या दुसऱ्या टेस्टमध्ये भारतावर पराभवाचं संकंट ओढावलं आहे. पहिल्या इनिंगमध्ये भारताचा १०७ रनवर ऑल आऊट झाल्यानंतर इंग्लंडनं ३९६-७च्या स्कोअरवर डाव घोषित केला. यामुळे इंग्लंडला २८९ रनची आघाडी मिळाली. आता भारताचे ६ खेळाडू माघारी परतले आहे. त्यामुळे इनिंगनं पराभव होण्याची नामुष्की भारतीय टीमवर ओढावू शकते.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

भारतानं लॉर्ड्सच्या ऐतिहासिक मैदानावर आत्तापर्यंत १७ मॅच खेळल्या आहेत. यातल्या ११ मॅचमध्ये भारताला पराभवाचा सामना करावा लागला. लॉर्ड्सवर भारतानं खेळलेल्या २ मॅचमध्ये भारताचा इनिंगनं पराभव झाला होता. त्यामुळे आता तिसऱ्यांदा डावानं पराभव व्हायचं संकट आहे.


आत्तापर्यंत इनिंगनं झालेले दोन्ही पराभव हे टेस्ट सीरिजच्या दुसऱ्या मॅचमध्येच झाले आहेत. त्यामुळे आता हा इनिंगनं झालेला तिसरा पराभवही सीरिजच्या दुसऱ्या टेस्ट मॅचमध्येच होणार असं दिसतंय. १९६७ साली भारत पहिल्यांदा लॉर्ड्सच्या मैदानात इनिंगनं हारला. मन्सूर अली खान पतौडी कर्णधार असलेल्या भारतीय टीमचा इनिंगनं पराभव झाला. १९७४ साली इंग्लंडनं भारताला इनिंग आणि २८५ रननी हरवलं होतं. त्या मॅचमध्ये इंग्लंडनं ६२९ रनचा डोंगर उभारला. त्यानंतर भारताला ३०२ आणि ४२ रनमध्ये ऑल आऊट केलं. 


लाईव्ह स्कोअर पाहण्यासाठी क्लिक करा