मुंबई : ICC T-20 वर्ल्डकप स्पर्धेत आज भारत आणि पाकिस्तान यांच्यात सामना रंगणार आहे. भारत-पाक यांच्यातील या महामुकाबल्याकडे संपूर्ण जगाचं लक्ष लागलं आहे. वर्ल्डकपमध्ये भारताने पाकिस्तानविरुद्ध कधीही पराभव पत्करला नाही. 2019च्या ICC क्रिकेट विश्वचषकात दोन्ही टीममध्ये शेवटची रंगत झाली होती. त्यावेळी देखील भारताने पाकिस्तानचा पराभव केला होता. यंदाही टीम इंडिया चांगल्या फॉर्ममध्ये दिसत आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

टीमचा विक्रम कायम ठेवण्यासाठी टीम इंडिया आज मैदानात उतरणार आहे. त्याचवेळी पाकिस्तानकडेही आपला खराब रेकॉर्ड सुधारण्याची चांगली संधी आहे. दोन्ही संघांमध्ये मोठे खेळाडू आहेत, जे एकटेच सामन्याचा रंग आणि निर्णय बदलू शकतात. तर भारत आणि पाकिस्तानच्या खेळाडूंमधील वाद सामन्यापेक्षा जास्त चर्चेत आहेत. भारत आणि पाकिस्तानच्या खेळाडूंमधील काही वादांवर एक नजर टाकूया.


गौतम गंभीर आणि कामरान अकमल


2010च्या आशिया कप दरम्यान, पाकिस्तानी विकेटकीपर कामरान अकमल भारतीय फलंदाजी गौतम गंभीरला सतत डिवचून त्याला त्रास देत होता. त्यानंतर गंभीर आणि अकमल यांच्यात जोरदार वादावादी झालेली पहायला मिळाली होती. अखेर या वादामध्ये त्यावेळी धोनीला हस्तक्षेप करावा लागला होता.



हरभजन सिंह आणि शोएब अख्‍तर


2010च्या आशिया चषक स्पर्धेत भारताला पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यात शेवटच्या 7 चेंडूत जिंकण्यासाठी 7 रन्स करावे लागणार होते. अशा परिस्थितीत शोएब अख्तरने विचित्र चेंडू टाकताच हरभजन सिंगला भडकवलं. या दोघांमध्ये मैदानावर जोरदार वाद सुरू झाला होता. त्यानंतर हरभजन सिंगने अमीरच्या चेंडूवर सिक्स मार भारताला विजय मिळवून दिला. विजय मिळविल्यानंतर हरभजन सिंगनेही आपली आक्रमक वृत्ती शोएब अख्तरला दाखवली.



गौतम गंभीर विरूद्ध शाहिद अफरीदी


2007 मध्ये, जेव्हा पाकिस्तान संघ भारत दौऱ्यावर आला होता, तेव्हा 5 सामन्यांच्या वनडे मालिकेतील तिसरा सामना कानपूरच्या ग्रीन पार्क स्टेडियमवर खेळला गेला होता. ज्यामध्ये गौतम गंभीर आणि शाहिद आफ्रिदी यांच्यात शिवीगाळ झाल्याचं समोर आलं होतं. गंभीर शाहिदच्या एका चेंडूवर धाव घेत होता. दोघांमध्ये टक्कर झाली आणि आफ्रिदीने हे जाणूनबुजून केलं असं गंभीरला वाटलं होतं. त्यानंतर दोघांमध्ये वाद सुरू झाला.



वीरेंद्र सहवाग आणि शोएब अख्‍तर 


2003च्या एका सामन्यात शोएब अख्तरला वीरेंद्र सेहवागकडे एकामागून एक बाउन्सर टाकले जात होते, जेणेकरून तो असा शॉट खेळेल की आऊट होईल. शोएबच्या या कृतीने वैतागलेला सेहवाग अख्तरकडे गेला आणि म्हणाला, हिम्मत असेल तर नॉन स्ट्रायकर एंडला उभ्या असलेल्या सचिनला बाउन्सर टा. यानंतर शोबएबने सचिनलाही बाऊंसर टाकले. यावर सचिनने शोएबच्या बाऊन्सरवर सहा सिक्स ठोकले होते. तेव्हा सेहवाग म्हणाला, ‘बाप बाप होता है और बेटा बेटा होता है.'